govinda corona news
govinda corona news  
मनोरंजन

बडे मियॉ नंतर छोटे मियॉलाही झाला कोरोना; कोरोना बॉलीवूडची पाठ सोडेना

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  देशभरात कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून दिवसागणिक प्रादुर्भाव वाढतच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला होता. सर्वसामान्यांसोबत कलाकारही कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. अक्षय कुमार याच्यानंतर अभिनेता गोविंदा यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लक्षण जाणवल्यानंतर गोविंदानं आपली चाचणी करुन घेतली होती. आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गोविंदा सध्या घरीच विलगीकरणात असून उपचार सुरु आहेत.

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः गोविंदा यांनी दिली. मला कोरोनाची लागण झाली असून माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची कोरोना चाचणी केली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आलाय.  पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेते गोविंदा यांनी दिली. तसेच माझी प्रकृती ठिक असून मी सध्या घरीच विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, लक्षण दिसल्यास चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही गोविंदा यांनी केली.

आलिया भट्ट, रणबीर कपूर , संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, क्रिती सेनन यांच्यासह काही बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली. आतापर्यत आलिया भट्ट, रणबीर कपूर , संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, क्रिती सॅनॉन, आदित्य नारायण, अमिताभ बच्चन यांच्यासह काही बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता कहर सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आले आहे.

आरोग्य प्रशासनानं युध्दपातळीवर कोरोनाला सामोरं जाण्यासाठी तयारी केली आहे. मात्र नागरिक सावधगिरी बाळगत नसल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्येही मोठ्या संख्येने कोरोना पसरला आहे. आतापर्यत अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. चित्रिकरणाच्या वेळी कलाकारांना कोरोना झाल्यानं ते चित्रिकरण थांबवण्यात आले आहे. तसेच पूर्ण क्रु क्वारंनटाईन झाल्याची माहिती कोरोनाग्रस्त कलाकारांनी सोशल मीडियावरुन दिली आहे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT