Ranbir Kapoor Anushka Sharma
Ranbir Kapoor Anushka Sharma esakal
मनोरंजन

Ranbir Kapoor: दोघांना आला राग, अनुष्कासोबतच्या भांडणाचं कारण समोर

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor New Movie: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. त्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होती. आलियाशी लग्न करण्याअगोदर रणबीरच नाव काही प्रसिद्ध (Alia Bhatt) अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्यामध्ये दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. सध्या रणबीरच्या बाबत एक बातमी व्हायरल होत (Anushka Sharma) आहे. त्यामध्ये त्याची आणि अनुष्का शर्माची भांडण झाली होती. असा उल्लेख आला आहे. रणबीरनं एक मोठा खुलासा केला आहे. सध्या रणबीर हा त्याच्या शमशेरामुळे चर्चेत आहे. त्याचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपटही प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

शमशेराचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद (Shamshera movie) मिळाला आहे. त्यात संजय दत्तची प्रमुख भूमिका आहे. काही दिवसांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या चित्रपटांना तगडे आव्हान दिलं आहे. शमशेराच्या ट्रेलरनं आव्हानाला जशास तसे उत्तरही दिलं आहे. त्याचे झाले असे की, जेव्हा शमशेराच्या प्रमोशनच्या वेळी रणबीरला तुला आवडणारी सहकारी अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला तेव्हा त्यानं अनुष्का शर्माचे नाव सांगितले. सौरभ शुक्ला या अभिनेत्यासोबत आपल्याला काम करायला नेहमीच आवडते. असेही रणबीरनं यावेळी सांगितले. बर्फी आणि जग्गा जासूसमध्ये त्यानं त्यांच्यासोबत काम केले होते.

रणबीरला अनुष्काच्याबद्दल आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, आमच्यात अबोला झाला याचे कारण आमच्यात झालेली भांडणं. आम्ही दोघेही एकमेकांशी खूप भांडलो होतो. आमचा राग अनावर झाला होता. त्यानंतर बराच काळ आमच्यात अबोला होता. आम्ही आता एकमेकांचे चांगले मित्र आहोत. अनुष्कासोबत भूमिका करणं हा मोठा आनंद असतो. ती क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. प्रोफेशनल आहे. तिच्याशी संवाद साधणे आनंददायी बाब असते. असेही रणबीरनं यावेळी सांगितले होते.

ये दिल है मुश्किल, बॉम्बे वेलवेट आणि संजु यासारख्या चित्रपटांमध्ये रणबीरनं अनुष्कासोबत काम केलं होतं. त्या चित्रपटांना मोठा प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर रणबीर आणि अनुष्काच्या रिलेशनशिपची चर्चाही रंगली होती. रणबीरच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा पुढील महिन्यात 22 जुलैला शमशेरा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर 9 सप्टेंबर रोजी त्याचा ब्रम्हास्त्र नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT