Lal singh chaddha
Lal singh chaddha  
मनोरंजन

लांब दाढी आणि पगडीच्या वेशातील हा अभिनेता आहे तरी कोण ?

वृत्तसंस्था

मुंबई : आमिर खान आणि करीना कपूर लवकरच एका चित्रपटामधून एकत्र दिसणार आहेत. 'लाल सिंह चढ्ढा' असं त्या बहुचर्चित सिनेमाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील करीनाचा फर्स्ट लुक लिक झाला आणि इंटरनेटवर व्हायरलही झाला. आता मात्र शुटिंगदरम्यानचा आमिर खानच्या फर्स्ट लुक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. लाल सिंग चढ्ढाच्या भूमिकेतला आमिरचा लुक दमदार आहे. 

वाढवलेली दाढी आणि डोक्यावर पगडी अशा सरदारच्या लुकमधल्या आमिरला ओळखणे जवळपास कठीणच झाले आहे. त्यामध्ये आमिर जांभळ्या कलरचा शर्ट आणि राखाडी रंगाच्या पॅन्टमध्ये दिसत आहे. चित्रपटाचं शुटिंग सध्या चंदिगढमध्ये सुरु आहे. 

काही दिवसांपूर्वी आमिरने इन्स्टाग्रामवर मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं होतं की,' क्या पता हम है कहानी या है कहानी में हम'. याआधी इंटरनेवटवर करीनाचा लुक लिक झाला होता त्यामध्ये ती गुलाबी रंगाच्या साध्या पंजाबी सुटमध्ये दिसत आहे. याआधी करीना आणि आमिरने थ्री इडियटस् आणि तलाश या चित्रपटांमधून एकत्र काम केलं आहे. त्या सिनेमांमध्ये आमिर आणि करीनाच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंत केलं होतं. 

आमिर त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळ्या अंदाजात  समोर येतो. त्याच्या लुकवर तो नेहमीच सिरिअस असल्याचं दिसतं. लगान, दिल चाहता है, रंग दे बसंती, दंगल, पिके, गजनी, धूम या चित्रपटांमध्ये तो अनोख्या लुकमधून प्रेक्षकांच्या समोर आला. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर वर्षातून मोजकेच सिनेमे करतो पण ते बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरतात. 

ठग्स ऑफ हिंदूस्तान या चित्रपटातून आमिर दिसला होता. त्यानंतर दोन वर्षांनी तो 'लाल सिंह चढ्ढा' या सिनेमातून झळकणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अर्द्वैत चंदन करत आहेत तर हा हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा रिमेक आहे. सिनेमा 2020 च्या क्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT