मनोरंजन

'एवढा गं तुला कसला गर्व'?,जान्हवीवर नेटकऱ्यांचा राग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. गुंजन सक्सेना मधून तिच्या वाट्याला मोठं यश आलं. त्यामध्ये तिनं महिला वैमानिकाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी त्या भूमिकेबद्दल जान्हवीचे कौतूक केले होते. सोशल मीडियावर जान्हवीचा बोलबाला असतो. ती त्यामुळे चर्चेतही असते. मात्र अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्याचे कारण तिचा स्वभाव. फोटो काढण्यासाठी आलेल्या पापाराझ्झींना उमर्टपणे उत्तर देणारी जान्हवी त्या कारणास्तव नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. त्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे.

त्याचं झालं असं की, तिनं एका पापाराझ्झीला बोलत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. यामुळे तिला नेटकऱ्यांनी गर्विष्ठ असं म्हटलं आहे. एवढा कसला राग जान्हवीला आला आहे. असा प्रश्नही नेटकऱ्यांनी यावेळी जान्हवीला विचारला आहे. बऱ्याचदा यापूर्वी नेटकऱ्यांना वेगवेगळ्या कारणास्तव ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूर, आयुषमान खुराणा, यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. करिना कपूर असो किंवा सलमान खान, शाहिद कपूर असो किंवा मीरा कपूर या सगळ्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी म्हणून मलायका अरोरा सर्वांना माहिती आहे. मात्र तिलाही अनेकदा ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे. त्यामुळे आता जान्हवीला देखील नेटकऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे.  जान्हवीनं पॅपराझीकडे दुर्लक्ष करणं हे तिला महागात पडलं आहे.

मात्र त्यावर जान्हवीनं कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जान्हवीला पाहून तो पापराझी म्हणाला की, जान्हवी तुला काय झाले, त्यावर जान्हवीनं काहीच उत्तर दिलं नाही. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही आल्या आहेत. जान्हवीच्या अॅटिट्युडवर बऱ्याचजणांनी टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT