Bollywood actress karishma kapoor look alike girl heena khan video viral
Bollywood actress karishma kapoor look alike girl heena khan video viral 
मनोरंजन

बाबो! ही तर सेम करिष्मा कपूरसारखी दिसते!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूरने 90 च्या दशकात तिच्या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तिच्या चित्रपटांमधील गाणी आणि तिचा डान्स लोकांच्या आजही पसंतीस पडतो. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकतीच सोशल मीडियावर करिष्मासारखी हुबेहूब दिसणाऱ्या मुलीची चर्चा सुरू आहे. करिष्मासारख्या दिसणाऱ्या या मुलीचे नाव हिना खान आहे. ती हुबेहूब करिष्मासारखी दिसते. करिष्माच्या गाण्यावर लिप्सिंग करतानाचे व्हिडिओ ती सोशल मिडीयावर नेहमी शेअर करत असते. व्हिडीओमध्ये ती नेहमी करिष्मासारखा लूक करते. अनेक नेटकरी हिनाला करिष्माची कॉपी करते म्हणून ट्रोल करतात. हिनाचे टिक टॉकवर 24 लाख फॉलोअर्स आहेत. तर इस्टाग्रामवर तिचे 35 हजार फॉलोअर्स आहेत. गोरा रंग, हावभाव, घारे डोळे या सर्व गोष्टींमुळे हिना करिष्मा कपूर सारखी दिसते. करिष्माचे अनेक चाहते करिष्मच्या वेगवेगळ्या गाण्यावर लिप्सिंग करायची रिक्वेस्ट करतात.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


करिष्मासोबतच ऐश्वर्या, करिना, दीपिका आणि श्रीदेवी या अभिनेत्रींसारख्या दिसणाऱ्या मुलींचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. तसेच अभिनेत्यांमध्ये सलमान खान, गोविंदा आणि शाहरूख यांच्या सारख्या दिसणाऱ्या मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. करिष्माच्या हीरो नंबर वन, जुडवा, राजा बाबू, कुली नंबर वन या चित्रपटांनी 90 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालूक प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण होते.  काही दिवसांपूर्वी करिष्माने अल्ट बालाजीवरील ‘मेंटल हूड’ या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिका केली होती. करिष्माने बरीच वर्ष मोठ्या पडद्यावर काम केले नाही. पण, या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मेंटल हूड या वेब सिरीजमध्ये करिष्माने ‘मदर हुड’ ही संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT