bollywood directors special
bollywood directors special  Team esakal
मनोरंजन

Directors Special; बॉलीवूडमधल्या दिग्गज दिग्दर्शकांची समोसा पार्टी

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) आपल्या हटक्या कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले काही दिग्दर्शक आहेत. ज्यांची लोकप्रियता मोठी आहे. प्रेक्षकांना त्या दिग्दर्शकांच्या कलाकृती कमालीच्या आवडल्या आहेत. वास्तविक त्या दिग्दर्शकांमध्ये (directors special) काही वैचारिक मतभेद आहेत. मात्र तरीही त्यांच्यातील मैत्री ही नेहमी सर्वांसाठी कौतूकाचा विषय राहिली आहे. असे ते दिग्गज दिग्दर्शक समोसा पार्टीसाठी (samosa party) एकत्र आले होते. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (bollywood directors anubhav sinha hansal mehta anurag kashyap reunite over samosas)

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा(anubhav sinha) , अनुराग कश्यप (anurag kashyap), हंसल मेहता (hansal mehta), सुधीर मिश्रा (sudhir mishra) आणि केतन मेहता (ketan mehta) बॉलीवूडमधील हे दिग्दर्शक जेव्हा एकत्र आले तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा माहोल तयार झाला होता. त्या क्षणाला मेहता यांनी कॅमे-यामध्ये टिपले होते. आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. चाहत्यांनी या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. बॉलीवूडमधील दिग्गज जेव्हा एकत्र येतात तेव्हा नक्कीच आनंद होतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अनुभव सिन्हा यांनी देखील आपल्या सोशल मीडियावरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी त्या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे, या सा-या मित्रांबरोबर फोटो शेअर करताना मला कमालीचा आनंद होतो आहे. माझ्य़ाजवळ भरपूर समोसे आहेत. आणि आता बाहेर पाऊस सुरु आहे. त्यामुळे अशाप्रकारचे रियुनिएन आमच्यासाठी महत्वाचे आहे. त्यांच्या त्या रियुनियनला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

त्या फोटोला दिया मिर्झानंही प्रतिक्रिया दिली आहे. तिनं म्हटलं आहे, अरे बाप रे, दिग्गज लोक.... अभिनेत्री दिव्या दत्तानं लिहिलंय, घातक....या दिग्दर्शकांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, अनुभव हे त्यांच्या अनेक नावाच्या चित्रपटाच्या तयारीत आहे. त्यांनी 2001 मध्ये तुम बिन नावाच्या चित्रपटापासून सुरुवात केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT