bollywood king khan shahrukh khan and ar rahman nostalgic after us navy members sing yeh jo des hai tera film swades 
मनोरंजन

अमेरिकेच्या नेवीनं गायलं 'ये जो देस है तेरा'; शाहरुख झाला भावूक 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  भारतीय चित्रपटांबद्दलचं प्रेम सर्वश्रृत आहे. त्याचा जगभरात बोलबाला आहे. अनेक प्रमुख देशांमध्ये बॉलीवू़डविषयी परदेशी प्रेक्षकांमध्ये आदराची भावना आहे. सध्या युएस नेव्हीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याला सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे कारण म्हणजे युएस नेव्हीच्या एका कार्यक्रमात 'ये जो देस है तेरा' हे गाणं सादर करण्यात आलं. जेव्हा ते गाणं सोशल मीडियावर गेलं त्यावेळी त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. त्या अमेरिकन जवानाचे कौतूक सगळ्यांनी केले. गाण्याचे व्टिट पाहिल्यानंतर बॉलीवूडच्या किंग खाननंही व्टिट केलं. त्याविषय़ी लिहिताना तो भावूक झाल्याचे दिसुन आले आहे.

त्याचे झाले असे की, अमेरिकी नौदलाच्या एका सैनिकानं शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातील 'ये जो देस है तेरा' हे गाणं गायलं. त्यानंतर ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. आणि त्या अमेरिकी नौदलाच्या सैनिकावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला. या गाण्याच्या व्हिडिओला भारताचे राजदूत तरनजीत सिंह सिंधूने व्टिटरवर शेअर केले आहे. शाहरुखच्या व्टिटरबरोबर त्याला ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमानचेही व्टिट आले आहे. त्यानंही त्या गायकाचे कौतूक केले आहे.

27 मार्चला अमेरिकन नौदलाच्या चीफ ऑफ नेवल ऑपरेशनच्या वतीनं एका मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हे गाणं गाण्यात आलं. नेव्हीचे चीफ मायकल मार्टिन गिलडे आणि अमेरिकेत असणारे भारताचे राजदुत तरनजीत सिंह यावेळी उपस्थित होते. त्यानंतर तरनजीत सिंह यांनी व्टिटरवर हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यांनी तो व्हिडिओ शेअर करताना एक कॅप्शनही त्याला दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे, ' ये वो बंधन है जो कभी तुट नही सकता'

शाहरुखला हा व्हिडिओ आवडला. त्यामुळे तो कमालीचा भावूक झाला आहे. त्यानं व्टिट करताना लिहिलं आहे की, आपण जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यासाठी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. खुपच प्रेरणादायी आणि सुंदर व्हिडिओ आहे. हे गाणं ऐकल्यावर मी पुन्हा त्या चित्रपटाच्या आठवणीत गेलो. ज्यावेळी हा चित्रपट आम्ही बनवत होतो. मोठ्या प्रयत्नानं आम्ही हा चित्रपट केला होता. आशुतोष गोवारीकर, ए आर रहमान, रॉनी स्क्रुवाला आणि सर्व लोकांचे मी आभार मानतो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT