Ram Gopal Verma controversial statement esakal
मनोरंजन

Ram Gopal Varma: राम गोपाल वर्मा अन् वादाचं लईचं जुनं कनेक्शन!

सकाळ डिजिटल टीम

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ते अनेकदा वादात भोवऱ्यात सापडला आहे. आता एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहेत. सोशल मीडियावर त्यांचा चित्रपट प्रमोशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राम गोपाल वर्माने ‘डेंजरस’ चित्रपट प्रमोट करण्यासाठी एक वेगळा फंडा वापरला. या व्हिडिओमध्ये ते अभिनेत्रीला फूट मसाज करताना दिसत आहेत. अभिनेत्री सोफ्यावर बसली असून, तो जमिनीवर बसलेले दिसतात. दरम्यान, ते अभिनेत्रीचा पाय हातात घेऊन किस करताना दिसतात. त्याच्या या व्हिडिओवरून प्रचंड ट्रोलिंग होत आहे शिवाय प्रेक्षकांचा संताप अनावर झाला आहे. राम गोपाल वर्माचं असं करणं काही नवीन‌ नाही याआधीही अनेक वेळा तो जबरदस्त वादात सापडला आहे. (Ram Gopal Verma controversial statement)

अडल्ड चित्रपट:

काही वर्षांपूर्वी एका संवादादरम्यान राम गोपाल वर्मा यांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारण्यात आले होतं. यावर तो म्हणाले की, रात्री दोन-तीन वाजता झोपलो तरी सकाळी सहा वाजता उठतो. तो उठताच, तो प्रथम 10 ते 15 मिनिटे adult चित्रपट पाहतो. हे पाहिल्यावर त्याचं मन उत्तेजित राहतं आणि ही ऊर्जा त्याला दिवसभर सक्रिय ठेवते.

भारतीय संघ हरल्याचा आनंद .

भारतीय क्रिकेट संघाला एकदा ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. यामूळे संपुर्ण देश दु:खी झाला होता आणि त्यावेळी राम गोपाल वर्माच्या एका ट्विटने आगीत तेल टाकलं. तो म्हणाला की मला क्रिकेट आवडत नाही त्यामुळे भारत हरल्याचा आनंद आहे. पण क्रिकेटपेक्षा तो क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतो.

महिला पत्रकाराचा अपमान:

राम गोपाल वर्मा यांच्या वीरप्पन या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सरळ महिला पत्रकाराचा चेहऱ्याबद्दल बोलला. रिव्ह्यू दिल्याबद्दल एका महिला पत्रकाराला उत्तर देताना तो म्हणाला की, तुमच्या रिव्ह्यूनुसार वीरप्पन तुमच्या चेहऱ्याइतकाच देखणा आहे. जर कोणी चित्रपटावर खाजगीत टीका करू शकता, तर चित्रपट निर्माता त्या व्यक्तीबद्दल तेच बोलू शकतो. असं तो पत्रकार महिलेला बद्दल बोलाला.

देवाला दोष:

इतकेच नव्हे तर राम गोपाल वर्माने कोरोना बदल असे ट्विट केले होते की चक्क देवाला दोषी केले. ट्विटवर त्याने लिहिले होते, 'मी ऐकले आहे की प्रत्येकजण यासाठी चीन, डब्ल्यूएचओ, ट्रम्प किंवा इतर सरकारांना दोष देत आहे किंवा डॉक्टरांपासून परिचारिका आणि जीवनावश्यक वस्तूंपर्यंत ओरडत आहे पण देवाला काही बोलत नाही. आपण काय करत आहेत? हे देवामुळेच घडले हे सर्वांनाच माहीत आहे. हा देवाचा बनलेला विषाणू आहे जो देवाने बनवलेल्या मानवांना मारत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू:

राम गोपाल वर्माने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल ही वादग्रस्त ट्विट केलं होत‌ "जर द्रौपदी राष्ट्रपती असेल तर पांडव कोण आहेत? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा कौरव कोण आहेत."या ट्विटनंतर दिग्दर्शकाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. ट्रोल झाल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी आता याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

२६ नोव्हेंबर दहशतवादी हल्ला:

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर राम गोपाल वर्माने ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला भेट दिली होती. भेट दिल्याबद्दल राम गोपाल वर्मा यांना नेटिझन्सच्या सामना करावा लागला. त्याच्या भेटीने अनेक सेलिब्रिटींनी राम गोपाल वर्माचा निषेध केला होता. “ताज हॉटेलला फेरफटका मारण्यामागील त्याचा हेतू कोणालाच माहीत नाही का? दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी भीषण दहशतवादी हल्ल्यांनंतर ताज आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये भेटीसाठी गेल्याबद्दल चित्रपट निर्मात्याला लाज कशी का नाही वाटली असं मत मांडले होते.

श्रीदेवी:

अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर रामगोपाल वर्माने आपल्या प्रेमाची कबुली देत श्रीदेवी बदल असं काही ट्विट केलं होत‌ की ते चांगलच गाजलं होतं. श्रीदेवीला " प्रसिद्धी,कीर्ती केवळ तिच्या अभिनय क्षमतेमुळेच नाही तर तिच्या मांड्यांमुळे मिळाली आहे " असं ट्विट त्याने केलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT