Shah Rukh Khan esakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: शाहरुख खानबाबत कस्टम अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा!

सकाळ डिजिटल टीम

 बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला शनिवारी संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून परत  येत असतांना मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखलं होतं. शाहरुख खान, त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि त्याचा अंगरक्षक रवी सिंग शारजाह बुक फेअरला उपस्थित राहून मुंबईला परतत होते.

त्याच्या बॅगमध्ये अनेक महागडी घड्याळे, बाबून आणि झुर्बक घड्याळे, रोलेक्स घड्याळांचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे , ऍपल सिरीजची घड्याळे सापडली असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर त्यांना विमानतळावर दंड म्हणून ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरण्यास सांगण्यात आले. आता या बातमीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. खुद्द कस्टम अधिकाऱ्यांनीच याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

कस्टम अधिकाऱ्याने खुलासा केला आहे की शाहरुख आणि त्याच्या टीमकडून कोणताही दंड घेण्यात आलेला नाही. केवळ प्राथमिक औपचारिकता पूर्ण करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, शाहरुख आणि त्याच्या टीमला आणलेल्या मालावरच ड्युटी भरण्यास सांगण्यात आले होते. त्यांच्याकडून कोणताही दंड वसूल करण्यात आल्याची माहिती चुकीची असून कोणताही दंड वसूल केलेला नाही. हे सर्व खोटे आहे.

 शाहरुखच्या बॉडीगार्डला खासगी जीए टर्मिनलवरून टी2 टर्मिनलपर्यंत का नेले, अशी विचारणा कस्टम अधिकाऱ्याला करण्यात आली. यावर ते म्हणाले की, जेव्हा एखाद्या प्रवाशाला ड्युटी किंवा असे कोणतेही शुल्क भरण्यास सांगितले जाते, तेव्हा त्याला जीए टर्मिनलवरून टी2 टर्मिनलवर नेले जाते, कारण तिथे प्रवाशांसाठी सुविधा आहेत.

अधिकाऱ्यानी असंही सांगितलं की शाहरुख आणि त्याची टीम अॅपल वॉच आणि वॉच वाइंडर केस घेऊन जात होती. शाहरुखला मिळालेल्या किमती भेटवस्तूंची किंमत 17.86 लाख रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले. एंकदरीत तो फक्त त्याला देण्यात आलेल्या भेटवस्तूच घेवुन जात होता. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या महागड्या वस्तू नव्हत्या.हे स्पष्ट करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Group Viral Vieo : किंग नाही किंगेमेकर... टायगर ग्रुपचे मुंबई पोलिसांनाच आव्हान ? कारच्या टपावरील हुल्लडबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये पाडव्याच्या रात्री निघाली रेड्यांची मिरवणूक

NCERT AI Training: आनंदाची बातमी! आता NCERTकडून शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार 5 दिवसांची एआय ट्रेनिंग, अशा प्रकारे करा नोंदणी

Delhi Police Encounter : सिग्मा टोळीचा म्होरक्या रंजन पाठकसह चार कुख्यात गुन्हेगारांचा एन्काउंटर; पोलीसांची मोठी कारवाई

Dabeli Sandwich Recipe: भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी सकाळी नाश्त्यात बनवा दाबेली सँडविच, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT