Shehnaaz Gill
Shehnaaz Gill Esakal
मनोरंजन

Shehnaz Gill: 'डोक्यात हवा गेली', शहनाज गिलवर चाहते भडकले

सकाळ डिजिटल टीम

शहनाज गिल हे नाव आता चांगलचं परिचीत झालं आहे. बिग बॉस 13 नंतर शहनाज गिलला एक नवीन ओळख मिळाली आहे. ती सर्वांची लाडकी आहे. तिचे चाहते तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. ती नवनवीन प्रोजेक्ट करतांनाही आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनांनतर तिला सर्वांनीच सहानभूतीही दिली. मात्र तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शहनाजच्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओवर युजर्स हाच तिचा खरा चेहरा असून हिच तिची सत्यता असल्याचं सांगत आहे.

शहनाज गिल आणि रॅपर एमसी स्क्वेअर त्यांच्या गाण्यामूळं चर्चेत आहे. या गोण्याचं प्रमोशन करण्यासाठी दोघ बिग बॉस 16 या रिअॅलिटी शोमध्ये गेले होते. पापाराझींने त्यांना सेटबाहेर घेरले. दरम्यान, शहनाज काही त्यांना पोझ देतांना त्याच्याशी उद्धटपणे संवाद साधतांना दिसतेय. ती म्हणते, "अरे, गाण्याचंही प्रमोशन करा." यांना फक्त फोटो हवे आहेत. यानंतर ती एमसी स्क्वेअरला इशारा करत गाणे गायला सांगते. तो घणी स्यानी गाणं गातो आणि शहनाजनेही गाण्यावर डान्स करते. गाणे संपताच शहनाज म्हणते, “ये सगळ कट होऊन जाइल आणि दुसरचं काही दिसेलं. मग पापाराझी तिला सोलो पोज देण्यास सांगतात, त्यावर शहनाज स्क्वायरचा हात धरून बिग बॉसच्या सेटकडे जाते आणि म्हणते, "सोलो का?"

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

शहनाजला तिच्या चांगल्या स्वभावासाठी सर्वांची लाडकी आहे. अशा परिस्थितीत शहनाजचं असं वागणं तिच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका यूजरने लिहिले की, ती अशी का वागत आहे? तर दुसर्‍याने लिहिले, "इच्यात इतका एटीट्यूड का?" तर काहींना असं वाटतयं की प्रसिद्धी मिळाल्यानंतर ती असभ्य झाली आहे. तिच्या डोक्या फेमची हवा शिरली आहे.

एकीकडे लोक शहनाजला तिच्या या वृत्तीबद्दल ट्रोल करत आहे तर तिचे काही चाहते समर्थनही करत आहेत. शहनाज आणि स्क्वेअर गाण्याच्या प्रमोशनसाठी आल्या आहेत, त्यामुळे पापाराझींनी गाण्याबद्दल बोलायला हवे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT