Captain Miller Box Office Day 1 : esakal
मनोरंजन

Captain Miller Vs Merry Christmas : धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा पहिल्याच दिवशी दणका, 'मेरी ख्रिसमस'ला दाखवला कोपरा!

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता धनुषचा कॅप्टन मिलर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

युगंधर ताजणे

Captain Miller Box Office Day 1 : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता धनुषचा कॅप्टन मिलर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या जोडीला विजय सेतुपतिचा मेरी ख्रिसमस नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. यात धनुषच्या कॅप्टन मिलरनं पहिल्याच दिवशी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

विजय सेतुपति, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मेरी ख्रिसमसनं पहिल्याच दिवशी २कोटी ५५ लाख रुपयांचा बिझनेस केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या चित्रपटाला आगामी दिवसांत मोठी कमाई करावी लागणार आहे. धनुषच्या कॅप्टन मिलरविषयी बोलायचे झाल्यास त्यानं पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.

प्रेक्षकांना, धनुषच्या चाहत्यांना त्याचा कॅप्टन मिलरमधील अंदाज भलताच आवडल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ८.६५ कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग डे मध्ये धनुषनं बाजी मारली आहे. सॅकनिल्कच्या एका रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी तमिळ भाषेतील चित्रपटांचा ४० टक्के वाटा राहिला आहे. तर हिंदीचा वाटा अवघआ ६.९२ टक्के एवढा आहे. यात एकट्या कॅप्टन मिलरचा आकडेवारी ७.९२ एवढी आहे.

दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, कॅप्टन मिलरला मेरी ख्रिसमसच्या तुलनेत जास्त चांगली ओपनिंग मिळाली असेल पण धनुषचा वाथी नावाचा जो शेवटचा चित्रपट होता त्याच्या तुलनेत ही ओपनिंग कमी आहे. सॅकनिल्कच्या एका रिपोर्टनुसार वाथीनं तमिळ आणि तेलुगू भाषेतून पहिल्याच दिवशी ९.७ कोटी रुपयांची कमाई केली होती. धनुषचा कॅप्टन मिलर हा अवघ्या ५० कोटींमध्ये तयार केला गेला आहे.

असं म्हटलं जात आहे की, साऊथच्या धनुषचा कॅप्टन मिलर हा बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर धनुषचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. नव्या वर्षात त्याच्या पहिल्याच चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतल्याचे दिसून आले आहे. त्या चित्रपटाला दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत असून पुढील आठवड्यात देखील त्याला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळेल असे ट्रेड अनालिस्टचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT