Comedy Marathi Film Vagheryas Poster Release
Comedy Marathi Film Vagheryas Poster Release 
मनोरंजन

विनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस

सकाळवृत्तसेवा

विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या 18 मे ला सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंन्मेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात झाला. 

सिनेमाच्या पोस्टरवर एक गाव दिसत असून, गोगलधारी बकरी आपल्याला पाहायला मिळते. तसेच पोस्टरवरील ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅॅगलाईनमुळे हा सिनेमा विनोदयुक्त मेजवानीचा आनंद प्रेक्षकांना देणार, याचा अंदाज येतो. सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन तसेच दिग्दर्शन समीर अशा पाटील यांनी केले आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात हास्याचा थंडावा घेऊन येत असलेला हा वाघेऱ्या प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, मराठीसृष्टीतील मातब्बर आणि अनुभवी विनोदवीर पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या कलाकारांचा यात समावेश असून, हि सर्व मिळून काय धुडगूस घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT