corona
corona 
मनोरंजन

कोरोना विषाणूवरील पहिला चित्रपट ‘कोरोना झोम्बीज’ प्रदर्शित, ही आहे खरी कहाणी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  जगभरात कोरोना विषाणू दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतासह अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे जगभरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. सर्वच देश आपापल्या परीने या विषाणूपासून बचावण्यासाठी वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. जगभरातील नोकरी, धंदे, व्यवसाय आदी सर्व बंद आहे. यासर्वांवर या विषाणूचा परिणाम होताना दिसतो आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील चित्रपटसृष्टी थंडावली आहे. मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण देखील बंद करण्यात आले आहे. सतत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेले हे कलाकार देखील घरात बसले आहेत. लॉकडाऊन असल्याने बॉलिवूड कलाकारांसोबत हॉलिवूड कलाकारही घरीच आहेत. सर्वच जण घरीच थांबून आपापली काम करत आहेत. चित्रपसृष्टी बंद असल्याने या दिवसांत एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणू चित्रपट बनणार असल्याची चर्चा सुरू होती. सगळं सुरळीत झाल्यानंतर या चित्रपटांवर काम सुरू होणार होते. अशातच सध्याच्या परस्थितीवर आधारीत प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट कोरोना विषाणू या विषयावर आधारीत आहे. या चित्रपटाचे नाव ‘करोना झॉम्बीज’ असे आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट कोरोना विषाणू या विषयावर आधारीत पहिलाच चित्रपट आहे. चार्ल्स बँड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रेनी कॅमरन, रसेल कोकर, रॉबिन सिडनी या कलाकारांनी काम केले आहे. चित्रपटाची स्टार कास्ट फारच छोटी आहे. याशिवाय हा चित्रपट बनवताना सोशल डिस्टंन्सिंगची पूर्णपणे काळजी घेतली आहे. 

या चित्रपटातून जगातील कोरोनामुळे झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो झॉम्बी बनतो. चित्रपटात काही रियल फुटेजचा वापर देखील करण्यात आला आहे. हा भयपट असून हा चित्रपट तयार करण्यासाठी ‘हॅल ऑफ द लिव्हिंग डेड’ आणि ‘झॉम्बीज’ vs स्ट्रिपर्स’ या हॉलिवूड चित्रपटातील काही फुटेज वापरण्यात आले आहेत. हा चित्रपट एक तासाचा आहे. आणि विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण केवळ 28 दिवसात करण्यात आले आहे. हा चित्रपट 'फुल मून पिक्चर्स' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना आत्ता तो पाहता येणार आहे. चित्रपटात कोरोना विषाणूच्या एक नवे रूप दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा अनुभव असेल.

coronavirus first film on coronavirus corona zombies released charles band  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT