Crew Teaser
Crew Teaser 
मनोरंजन

Crew Teaser: "कुर्सी की पेटी बांध लें, क्योंकि...", 'क्रू'चा मजेशीर टीझर रिलीज

priyanka kulkarni

Crew Teaser: अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan), तब्बू (Tabu) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) स्टारर क्रू या चित्रपटचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे देखील दिसत आहेत. टीझरमधील डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

करीनानं शेअर केला टीझर

करीनानं क्रू या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला तिनं कॅप्शन दिलं, "कुर्सी की पेटी बांध लें, क्योंकि यहां का तापमान आपके लिए बहुत गर्म होने वाला है" टीझरमध्ये करीना, तब्बू आणि क्रिती या तिघी एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसत आहेत. फ्लाईटमध्ये या तिघींसोबत घडलेल्या घटनांची झलक टीझरमध्ये दिसत आहे. क्रू चित्रपटाचा टीझर कॉमेडी आहे. या टीझरमधील कॉमेडी सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

कधी रिलीज होणार 'क्रू'?

करीना, क्रिती आणि तब्बू यांचा हा चित्रपट क्रू 29 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश के कृष्णन यांनी केले आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. एकता कपूर आणि रिया या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. क्रूया चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून चित्रपटाच्या कथेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

एकता कपूर आणि रिया क्रू या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. त्यापूर्वी त्यांचा 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता क्रू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT