मनोरंजन

कलेची सेवा हाच आमचा ध्यास...!

संभाजी गंडमाळे

मी मंगळवार पेठेतला. ज्या परिसरात मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच गल्लीतला. आमच्या तीन पिढ्यांनी जयप्रभा स्टुडिओ असो किंवा एकूणच कलेसाठी सेवा केली. तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करताना तोच ध्यास घेऊन मी नृत्य दिग्दर्शनात आलो आणि त्यात नवीन संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच मी नृत्य दिग्दर्शन केलेले ‘बाई’, ‘पानिपत’ आणि ‘कर्मवीरायण’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. युवा नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर संवाद साधत असतो आणि एकूणच या क्षेत्रातील त्याचा प्रवास उलगडत जातो. 

संग्रामचे आजोबा जयप्रभा स्टुडिओत काम करायचे. त्यांच्या बोटाला धरून वडील (कै.) यशवंत भालकर स्टुडिओत काम करू लागले आणि पुढे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. हा वारसा पाठीशी असल्यानं आपसूकच या क्षेत्रातच करिअरचा निर्णय त्यानं घेतला. एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण. त्यानंतर कलानिकेतन, कलामंदिर महाविद्यालयात त्यानं कलाशिक्षण घेतलं.

कलाशिक्षण घेत असतानाच सतीश बिडकर यांच्याकडं कला दिग्दर्शनासाठी सहायक म्हणून काम सुरू केलं. याच दरम्यान प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनी नृत्य दिग्दर्शनासाठी सहायक म्हणून काम करण्याची संधी दिली आणि येथूनच नृत्य दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला. ‘पिसारा’, ‘हायकमांड’, ‘राजमाता जिजाऊ’, ‘लेक लाडकी’, ‘धाव मन्या धाव’, ‘हृदयात समथिंग’ आदी तेवीसहून अधिक मराठी चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं. ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘कृष्ण’ या मालिकांसाठीही त्यानं नृत्यदिग्दर्शन केलं. पुणे फेस्टिव्हल असो किंवा देशभरातील अनेक फेस्टिव्हलसाठीही त्यानं कोरिओग्राफी केली असून, विविध लघुपटांच्या माध्यमातूनही त्यांनं विविध संकल्पना पुढे आणल्या आहेत. 

कोल्हापूर डान्स असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून तो सध्या कार्यरत आहे. शहर आणि जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील तरुणाईला संघटित करून विविध उपक्रमांवर भर देत आहे. अर्थातच त्याच्या सर्व मित्रांची त्याला साथ आहे. भालकर्स कला अकादमी, यशवंत भालकर फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटक आणि सिनेमांसाठी योगदान दिलेल्यांचा गौरव आणि विविध कार्यक्रमांसाठी त्यानं पुढाकार घेतला आहे.   

नृत्यदिग्दर्शनात येत्या काळातही बरेच काही करायचे आहे. त्याचबरोबर डान्स असोसिएशनच्या माध्यमातून जगभरातील चांगल्या गोष्टी कोल्हापुरात कशा आणता येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे.
- संग्राम भालकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT