Deepika Padukone Bafta Film Awards esakal
मनोरंजन

Deepika Padukone : 'ऑस्कर' नंतर 'बाफ्ता' पुरस्कारालाही असणार दीपिकाची हजेरी, 'या' सेलिब्रेटींसोबत झळकणार!

ऑस्कर सोहळ्यानंतर दीपिका ही आता बाफ्ता पुरस्कार (Deepika Padukone Bafta Film Awards) सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Deepika Padukone Bafta Film Awards : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. गेल्या वर्षी ती जगप्रसिद्ध अशा ऑस्कर (Oscar 2023) सोहळ्यात चमकली होती. यावेळी ती बाफ्ता या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हे आंतरराष्ट्रीय (Deepika Padukone ) स्तरावर आपली मोहोर उमटविताना दिसत आहेत. त्यात मौनी रॉ़य, आलिया भट्ट, ऐश्वर्या रॉय, क्रिती सेनन यांच्या नावाचा समावेश आहे. यापूर्वी प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra) हॉलीवूडमध्ये तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. ती आणि तिचा पती निक जोनास हे दोघे जण ऑस्कर सोहळ्याच्या सदस्य समितीमध्ये होते.

आता दीपिकाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. दीपिकानं गेल्या (Deepika Padukone Latest news) वर्षी ऑस्कर सोहळ्यात सहभाग घेतला होता. आता ती यंदाच्या बाफ्ता सोहळ्यात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया डॉट कॉमनं याबाबत वृत्त दिले आहे. व्हरायटीच्या एका रिपोर्टनुसार दीपिका ही बाफ्ताच्या पुरस्कार सोहळ्यात दिसणार आहे.

Deepika Padukone Bafta Film Awards

दीपिकासोबतच जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम, केट ब्लेंचेट, दुआ लीपा हे सेलिब्रेटी देखील यावेळी सोहळ्यात दिसणार आहेत. दीपिकानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन आयोजकांचे आभार मानल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यात सहभागी होत दीपिकानं भारतीय प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

येत्या रविवारी लंडनमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या सगळ्यात दीपिकासोबत जे सेलिब्रेटी आहेत त्यांना कोणत्या नॉमिनेशनसाठी पुरस्कार द्यायचे आहे हे अद्याप समोर आलेले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्युग ग्रांट, एमिली इन पॅरिस फेम लिली कॉलीन, द क्राऊन फेम कोरिन आणि गिलियन एंडरसन, ब्लॅक मिरर फेम हिमेश पटेल यावेळी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT