Deepika padukone debuted on tik tok  
मनोरंजन

दीपिकाची टिकटॉकवर ग्रँड एन्ट्री, पहिला व्हिडीओ पाहाच !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'ओम शांती ओम' चित्रपटाने दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडच्या टॉप अभिनेंत्रीमध्ये दीपिका अव्वल आहे. दिवसेंदिवस तिची फॅनफोलोइंग वाढतेच आहे. सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव असते आणि चाहत्यांच्या संपर्कात असते. काल दीपिकाने 34 व्य़ा वर्षात पदार्पण करत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक खास गिफ्ट देत टिकटॉकवर एन्ट्री केली आहे !

@deepikapadukone

abhi thoda raap shaap kartein hein!@motivationkimachine

original sound - deepikapadukone

दीपिका आता टिकटॉकवर आली आहे आणि तिने अकाउंटवर काही मजेशीर व्हिडीओही शेअर केले आहेत. टिकटॉकवर आल्याने दीपिकाच्य़ा सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे अवघ्या 12 तासातच 12 लाख फोलोअर्स झाले आहेत. काल दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त टिक टॉकचे काही स्टार एकत्र आले. दीपिकाला खास स्टाइलने शुभेच्छा देत त्यांनी व्हिडीओही केला. या काही टिक टॉक स्टारसोबत दीपिकानेही मजेशीर व्हिडीओ केले. 

@deepikapadukone

eternally mischievous... @avivinay

original sound - deepikapadukone

टिक टॉकवरील दीपिकाच्या बालपणी ते आतापर्यंतच्या फोटोंचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दीपिकाचा बहुचर्चित आगामी सिनेमा 'छपाक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच दीपिका सध्या व्यस्त आहे.

@deepikapadukone

Thank you for your constant love and support... @awezdarbar @nagmaa @faby_makeupartist @motivationkimachine @ur_smartmaker @gunjanshouts @mr.mnv

 original sound - deepikapadukone

'छपाक' ची कहाणी आधारीत आहे ती लक्ष्मी अग्रवालवर. लक्ष्मीसोबत दीपिकाने काही टिक टॉक व्हीडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओजना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळतेय आणि दीपिकाचे टीक टॉकवरील फोलोअर्सची संख्याही वाढतेय. 
टिक टॉकवर येताच दीपिका प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाली, 'अनेकांना मी शांत स्वभावाची व्यक्ती वाटते. पण, याउलट वेडी, मजेशीर आणि खोडकर असाही माझा स्वभाव आहे. हा स्वभाव फक्त जवळच्या लोकांना माहित आहे. टिक टॉकच्या माध्यामातून माझा हा पैलूही चाहत्यांसमोर मला आणायचा आहे आणि मजेशीर बाजू शेअर करायची आहे'.

@deepikapadukone

Boom Boom Pow! @ur_smartmaker

 original sound - deepikapadukone

'छपाक' येत्या 10 जानेवारीला प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार तर निर्देशन स्वत: दीपिकाने केलं आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडक्या बहिणींना १४ जानेवारीपूर्वी मिळणार ४५०० रुपये; नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार, वाचा...

आजचे राशिभविष्य - 20 डिसेंबर 2025

Weekend Special Breakfast : वीकेंडला सकाळी नाश्त्यात बनवा खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

राज्य सरकारचा मोठा निर्णय; विवाहासाठी ‘या’ जोडप्यांना मिळणार आता अडीच लाख रुपये; काय आहेत अटी, कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कोठे करायचा? वाचा...

IND vs SA, 5th T20I: तिलक वर्मा-शिवम दुबे एकाच दिशेला धावले, पण रनआऊट नेमकं झालं कोण? शेवटच्या चेंडूवर गोंधळ

SCROLL FOR NEXT