'झी मराठी' वाहिनीवरील 'देवमाणूस' या मालिकेच्या पहिल्या सिझनला सुरुवातीला काहीशा नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. पण नंतर नंतर मात्र मालिकेनं पकडलेला वेग,कलाकारांचा अभिनय,कथेमधील रंजकता या सगळ्या गोष्टींमुळे देवमाणूस मालिकेनं टीआरपीच्या शर्यतील पुढचा नंबर गाठला. मालिकेच्या शेवटच्या भागात खलनायकी डॉक्टराचा आता तरी अंत दाखवतील असं वाटत असताना तसं काहीच घडलं नाही. आणि कळून चुकलं की मालिका पुन्हा भेटीला येतेय. 'देवमाणूस २' मालिका या रविवारी विशेष 'महाआरंभ' भागापासून त्यानंतर पुन्हा सोमवार ते शनिवारमध्ये दाखवली जाणार आहे, त्यानिमित्तानं 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची 'ईसकाळ'नं विशेष मुलाखत घेतली. तेव्हा सुरुवातीलाच किरण म्हणाला,''मला मालिकेच्या पहिल्या भागाचं शुट करतानाच खूप त्रास होत होता. ज्यादिवशी मालिकेत खून दाखवले जायचे त्याचं शुटिंग मी करायचो त्यादिवशी मानसिक रीत्या खचून जायचो. मला झोप लागायची नाही. आता पुन्हा ती भीती सुरू झाली''असंही किरण म्हणाला.
''जेव्हापासून अभिनय करायला लागलोय मग अगदी माझ्या शाळा-कॉलेजच्या दिवसांपासून पाहिलं तर नेहमीच मला खलनायक साकारायला आवडायचं,असं किरण म्हणाला''. 'लागिरं झालं जी' या पहिल्या मालिकेतून 'भैय्यासाहेब' ही खलनायकी भूमिका साकारणा-या किरणचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळुफूले हे नेहमीच फेव्हरेट खलनायक राहिले आहेत. तर मारामारी करणारा खुनशी व्हिलन आपल्याला कधीच रंगवायला आवडणार नाही मात्र 'देवमाणूस' मध्ये रंगवलेला सायलेन्ट किलर रंगवणं नेहमीच आपली पहिली पसंती राहिल असंही किरणनं आवर्जून सांगितलं. मालिकेत डॉ.अजित कुमार देवला इतके गुन्हे करूनही शिक्षा होत नाहीय पण ती भूमिका रंगवणारा किरण म्हणतोय,''लहानपणी मात्र मला छोट्या-मोठ्या खोड्यांमुळेही भरपूर मार खावा लागलाय. शाळेत नेहमीच मी बॅकबेंचर होतो. अभ्यासापासनं लांब पळायचो पण आता जे काम करीन ते फ्रंटफूटवर राहून करायचंय'' असंही किरण म्हणाला.
मालिकेत नवीन स्त्रीची एंट्री झाली की तिच्या मागे लंपटासारखा हात धुवून लागणारा डॉ.अजित कुमार देव रंगवणा-या किरणला प्रत्यक्षात मात्र कॉलेज डेजमध्येही मुलींच्या मागे वेळ घालवला नाही असं सागताना हसू आवरले नाही. तर मालिकेमुळे प्रसिद्धि तर मिळाली पण ती शिव्यांच्या रुपात अनुभवतोय असं सांगताना किरण पुढे म्हणाला,''एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावी गेलो की तिथल्या आजीबाईंनी शिव्या दिल्याच म्हणायच्या. मग त्यांना समजावता समजावता जी दमछाक होते तो अनुभव भन्नाट. पण त्या शिव्या म्हणजे माझ्या कामाची पोचपावती आहे हे लक्षात आलं की मन मात्र आनंदानं भरुन येतं. आता पुन्हा 'देवमाणूस २' मधनं भेटीस येतोय तेव्हा असाच लोकांनी माझा राग करावा आणि लोभ असावा म्हणत किरणनं भविष्यात खलनायकचं रंगवायचाय'' हे आवर्जुन सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.