सेलिब्रेटी बाप्पा! नियमांच्या चौकटीत चौकटीत राहूनच गणेशोत्सवाचा साजरा करणार - सोनाली कुलकर्णी 
मनोरंजन

सेलिब्रेटी बाप्पा! नियमांच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करणार - सोनाली कुलकर्णी

संतोष भिंगार्डे

मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सवासाठी सरकारने काही नियम बंधनकारक केले आहेत. त्यांचे सगळ्यांनी पालन केलेच पाहिजे. मी माझ्या वतीनेही सगळ्यांना आवाहन करते, की आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी सरकारचे नियम आवर्जून पाळा. कारण, आपल्याच आरोग्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवाची धामधूम नसेल. आमच्या घरी बाप्पांचा मुक्काम दहा दिवस असतो. यंदा मात्र मोजक्‍या मंडळींच्या उपस्थितीतच गणेशोत्सव साजरा होईल.

आम्ही दर वर्षी गणेशाची मूर्ती घरच्या घरी बनवतो. माझा भाऊ मूर्तीला आकार देण्याचे काम करतो आणि मग मी रंगरंगोटी करते. घरातील गणपतीची सजावट वगैरे मीच करते. आमच्या गणेशोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी स्थापनेच्या दिवसापासून विसर्जनापर्यंत मी घरीच आहे. कारण दर वर्षी मी गणेशपूजनाच्या आणि विसर्जनाच्या वेळी घरी असतेच. इतर दिवशी कुठे गणेश दर्शन; तर कुठे चित्रीकरण ठरलेलेच असायचे; पण यंदा उत्सवाचे दहाच्या दहा दिवस मी घरीच आहे. 


मी आता स्वयंपाकही करायला शिकले आहे. त्यामुळे गणपतीसाठीचा नैवेद्य वगैरे मी करणार आहे. स्वतः मोदक बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आमचे आजोबा पूजा सांगायचे आणि आरती करायचे. ती परंपरा आता वडिलांनी जपली आहे. पूजापाठ वडीलच करतात. घरी येणारी नातेवाईक मंडळी खूप असतात; परंतु यंदा काही मोजक्‍याच मंडळींना बोलावणार आहोत. माझी आजी काकांकडे आहे. ती आता आमच्याकडे येईल. 

घरीच मूर्ती... घरीच विसर्जन
सरकारचा नियम आहे की गणेशमूर्ती दोन फुटांची असावी. आम्ही घरीच मूर्ती बनवत असल्यामुळे ती छोटीच असते. मूर्ती बनवायला आता सुरुवात करणार आहोत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही मूर्ती दरवाजापर्यंत नेतो. माझे वडील आणि भाऊ ती घरात आणतात आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. विसर्जन आम्ही आमच्या घराच्या गॅलरीत मोठे गार्डन आहे तेथे करतो. त्यामुळे गर्दीत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. 

विशेष म्हणजे या वर्षी माहेरचा माझा शेवटचा गणेशोत्सव आहे. पुढील वर्षी मी सासरी असणार आहे. तेथे गणपती बाप्पा आणायचा की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. पुन्हा एकदा सांगते, नियम पाळा आणि आरोग्याची काळजी घ्या...

-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT