FIFA World Cup 2022
Nora Fatehi
FIFA World Cup 2022 Nora Fatehi Esakal
मनोरंजन

FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक कार्यक्रमात नोरा दिसेना; चाहते म्हणाले, “शोधू कुठं?”

सकाळ डिजिटल टीम

FIFA World Cup opening ceremony Nora fatehi: रविवारपासून कतार फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२च्या उद्घाटन समारंभात मोठ्या दिमाखात पार पडला. यात  पाच आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार आपली कला सादर करताना दिसणार होत. हा भव्य उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बिद्दा पार्क येथे झाला, ज्यामध्ये जगभरातील २० हून अधिक कलाकार संध्याकाळची रंगत वाढवणार होते.

FIFA विश्वचषक स्पर्धेला एका भव्य उद्घाटन सोहळ्यासह प्रसंगी बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही देखील धिरकणार होती. चाहते तिचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सूक होते. भारतातही तिचा डान्स पाहण्यासाठी टिव्हि सेटवर समोर नजरा लावून चाहते तिच्या डान्सची वाट पाहत होते मात्र ती काही दिसलीच नाही.

किक-ऑफच्या एका अहवालाच्या सांगण्यात आल्यानुसार, नोरा मोठ्या मंचावर परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज होती, तथापि, अभिनेत्री ओपनिंग शोमध्ये परफॉर्म करणार नव्हती,तर 29 नोव्हेंबर रोजी फिफा फॅन फेस्टिव्हलमध्ये इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींसोबत नोरा परफॉर्म करणार आहे.

मात्र तिच्या परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सूक लोकांनी ट्विटवर धडाधड ट्विट करण्यात सुरवात केली.उद्घाटन समारंभानंतर अनेकांनी टि्वटरवर विचारले की, "नोरा फतेही कुठे होती काही कल्पना?" तर दुसर्‍याने ट्विट केले, "मी कुठेतरी वाचले होते की #Norafatehi ला FIFA मध्येही परफॉर्म करणार आहे.. ते झालं नाही."

"नोरा फतेही कुठं आहे? आम्ही वाट पाहतोय पण ती फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभात नव्हती," दुसर्‍या निराश चाहत्याने विचारले.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

जगभरातील चाहत्यांसाठी फुटबॉल, संगीत, संस्कृती आणि जीवनशैली एकत्र आणणाऱ्या 29 दिवसांचा FIFA विश्वचषक स्पर्धेत नोराचे चाहते तिला पाहण्याची आशा करू शकतात. यात 100 तासांचे लाईव्ह म्युझिक, 64 मोठ्या-स्क्रीन फिफा वर्ल्ड कप टीएमचे सामने, फिफा लीजेंड्ससह विशेष फुटबॉल सामने आणि खाद्य पदार्थांचा आनंद घेता येणार आहे.

कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या FIFA विश्वचषकात पहिला सामना यजमान कतारसोबत इक्वाडोरसोबत झाला होता. या सामन्यात कतारचा 2-0 असा पराभव झाला. फिफा विश्वचषक 28 दिवस चालणार असून यामध्ये एकूण 64 सामने खेळवले जाणार असून 32 देश यात सहभागी होणार आहेत. या विश्वचषकाचा अंतिम सामना १३ डिसेंबरला होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT