gachchi marathi movie priya bapat esakal news  
मनोरंजन

'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात 

सकाळ डिजिटल टीम

अभय महाजनला करावी लागली प्लास्टिक सर्जरी

मुंबई : शुटींगदरम्यान एखाद्या कलाकाराला झाली इजा, अश्या शीर्षकाच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. आपल्या कामात चोखपणा आणण्यासाठी भूमिकेत प्राण ओतणा-या प्रत्येक कलाकाराला अश्या घटनांना सामोरे जावे लागते. अशीच एक घटना लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित 'गच्ची' या सिनेमातील अभिनेता अभय महाजनसोबत घडली.

नचिकेत सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली गच्चीवर झालेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान अभय आपल्या भूमिकेत इतका गुंग झाला होता कि, तो गच्चीवरील एका कठड्यावर जोरात आदळला. आपली सहकारी कलाकार प्रिया बापटसोबतचा एक सीन शूट करीत असताना, अभयचा बेलेंस बिघडला, आणि थेट एका कठड्यावर त्याचा कपाळमोक्ष झाला. 

स्वतःला अभिनयात पूर्णपणे झोकून दिल्यामुळे बेसावध असलेल्या अभयला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. कठडा जोरात लागल्यामुळे त्याच्या कपाळावर भलीमोठी खोचदेखील पडली होती. जखम अधिक खोल असल्याकारणामुळे त्यावर टाके मारावे लागले होते. मात्र, शुटींगचा तिसराच दिवस असल्याकारणामुळे, संपूर्ण सिनेमा चित्रित होणे बाकी होता. त्यामुळे अभयच्या डोक्यावर पडलेले टाके संपूर्ण चित्रपटात दिसणार होते. असे होऊ नये, म्हणून अभयच्या कपाळावर प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात आली.

सिनेमाच्या चित्रीकरणारंभालाच झालेल्या या अपघातामुळे, संपूर्ण युनिटदेखील हादरून गेले होते. मात्र 'शो मस्ट गो ऑन' म्हणत अभयने सर्वांना धीर देत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेली 'गच्ची' वरील ही गोष्ट, सिनेरसिकांना मनोरंजांची मोठी मेजवानी देऊन जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

Mumbai-Pune Expressway : चालकांची नियम मोडण्यात ‘द्रुतगती’, तब्बल २७ लाख वाहनांवर कारवाई; ४७० कोटींचा दंड, ५१ कोटी वसूल

Snake Video : गळ्यात साप, दातात साप! लाखों ‘जिवंत’ नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा; व्हिडीओ तुफान व्हायरल

काय सांगता? 'तारक मेहता...' मधील माधवी भाभी चेन स्मोकर आहे? म्हणते- मला काहीही फरक पडत नाही...

R. Madhavan Son's Daily Routine: "लवकर झोपा, लवकर उठा!" आर. माधवनचा मुलगा रोज उठतो पहाटे ४ वाजता! आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठणं आरोग्यासाठी का ठरते गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT