gashmir mahajani reakshabandhan esakal news
gashmir mahajani reakshabandhan esakal news 
मनोरंजन

गश्मीरच्या बहिणीला हवी राखीवाली सेल्फी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : अभिनेता गश्मीर महाजनी सध्या खूप बिझी आहे. त्याची फिल्म ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ येत्या शुक्रवारी रिलीज होतेय. त्यामूळे तो वेगवेगळ्या शहरात जाऊन फिल्मचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. म्हणूनच यंदा रक्षाबंधनाला तो त्याच्या मोठ्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरं करू शकणार नाही.

गश्मीरला त्याच्या मोठ्या बहिणीविषयी विचारल्यावर तो म्हणतो, “माझी ताई माझ्यापेक्षा तेरा वर्षांनी मोठी आहे. त्यामूळे ती माझी दूसरी आई आहे, असं म्हटलं तरी चालेल. मी तान्हा असल्यापासून तिने मला सांभळलंय. माझं प्रत्येक गुपित ताईसोबत शेअर होतं. माझी ताई माझ्यासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे, असंच म्हणा ना.”

तो पुढे सांगतो, “ माझी मोठी बहीण रश्मी महाजनी-वैद्य तिच्या लग्नानंतर बेळगावला राहते. त्यामूळे माझं फिल्मी करीयर चालू झाल्यापासून दरवर्षी आम्हांला एकत्र रक्षाबंधन साजरं करता येतंच, असं नाही. पण मी जगात कुठेही असलो, तरीही मला माझ्या पत्त्यावर एक दिवस आधीच राखी पोहोचते. एका वर्षी मी मध्यप्रदेशात शुटिंग करत होतो. शूटिंग मध्यप्रदेशातल्या खूपच आतल्या भागात होतं. तो पत्ता शोधणं कठीण असतानाही तिची राखी एक दिवस आधी पोहोचली. यंदाही हा नियम चुकणार नाही, ह्याची मला खात्री आहे.”  

गश्मीरकडे राखी पोहोचल्यावर ती रक्षाबंधनाच्या दिवशी हाताला बांधून त्याचा फोटो बहिणीला पाठवणं फक्त बंधनकारक असतं. त्यामुळे यंदाही गश्मीर रक्षाबंधनाला हाताला राखी बांधून ताईला सेल्फी पाठवणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT