gautami patil,  SAKAL
मनोरंजन

Gautami Patil: शेवटी नादच दुसरं काय! बर्थ डे आहे बैलाचा अन् डान्स गौतमीचा...

सकाळ डिजिटल टीम

सबसे कातील गौतमी पाटील हे असं नाव आहे जे सध्या अवघ्या महाराष्ट्राच्या तोंडात आहे. सोशल मिडिया सुरु केल तर हमखास तुम्हाला गौतमीचा व्हिडिओ दिसेलच. तिचे कार्यक्रम चांगलेच गाजतात.

तिच्या कार्यक्रमात नेहमीच काहीतरी राडा होतो आणि त्याची बातमीही येतेच. मात्र आज विषय जरा वेगळा आहे. कारण गौतमीच आहे पण इथे चर्चा गौतमीची कमी आणि अश्विनच जास्त आहे.

आता अश्विन म्हणजे कुणी व्यक्ती किंवा लहान मुलगा नाही तर तो आहे पैलवान सतीश भोसले यांनी जीवापाड जपलेला बैल. साताऱ्याच्या बैलाचं नावं आहे अश्विन आणि आज त्याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसा निमित्त आज या गावात गौतमीच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सतीश भोसले हे सातारा जिल्ह्यातील खर्शी गावचे रहिवाशी आहेत. अश्विन हा भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांचा लाडका बैल आहे. घरातील सर्वच मंडळी त्याच्यावर अगदी मुलासारखं प्रेम करातात. इतकच नाही तर ते दरवर्षी या बैलाचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात.

यंदा आश्विनचा तिसरा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने भोसलेंनी थेट गौतमी पाटील हिच्याच कार्यक्रमाचा आयोजन केलंय. आता हा सर्व प्रकार पाहून गावकरीही थक्क झाले आहेत. आता तेही गौतमीच्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत आणि कार्यक्रमाच्या तयारीलाही जोरदार सुरवात झाली आहे.

खर तर आजवर गौतमी पाटीलचे अनेक कार्यक्रमांची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच एका पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला साताऱ्यातच गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला होता. आता चक्क बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील येणार असल्यानं याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

गेल्याकाही दिवसांपासून गौतमी तिच्या व्हायरल व्हिडिओसाठी चर्चेत आहे. या प्रकरणावर तिनं बोलायचं टाळलं असून कायदेशीर कारवाई सुरु असल्याच तिनं म्हटलं. त्याचबरोबर गौतमी म्हणते, मला जे चांगले म्हणतात त्यांना धन्यवाद देते. जे नाही म्हणत त्यांना बाय बाय करते. लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतच महिला दिनाच्या निमित्तानं तिचा गौरवही करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

लष्कराच्या कामाचं कंत्राट देण्यासाठी ५० लाखांची लाच, कर्नलला अटक; CBIच्या कारवाईने खळबळ

Latest Marathi News Live Update : ३० जूनपर्यंतच संधी; HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कडक कारवाई

IPL: मुंबई-कोलकतामध्ये केवळ वर्चस्वाची लढाई; अजिंक्य रहाणेचा संघ पराभवाची परतफेड करणार?

Neymar: अनुभवी नेमारचे ब्राझील संघात पुनरागमन; फुटबॉल विश्वकरंडकासाठी निवड; तीन वर्षांनंतर राष्ट्रीय टीममध्ये

SCROLL FOR NEXT