the girl on the train movie review starring parineeti chopra aditi rao kirti kulhari avinash tiwary directed by ribhu dasgupta
the girl on the train movie review starring parineeti chopra aditi rao kirti kulhari avinash tiwary directed by ribhu dasgupta  
मनोरंजन

'The Girl On The Train' पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे 

युगंधर ताजणे

मुंबई -  ब-याचदा वेगळं काही बनवायचा ध्यास घेतल्यानंतर हाताशी जे हवं ते न लागता भलतेच काही येते. असा प्रकार नुकताच प्रदर्शित झालेल्या द गर्ल ऑन द ट्रेन नावाच्या चित्रपटातून पाहायला मिळतो. ज्यावेळी त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तेव्हा हा चित्रपट काही वेगळ्या प्रकारचा असेल असे वाटले होते. प्रत्यक्षात तो पाहिल्यावर उगाचच त्यात वेळ घालवला असे वाटल्याशिवाय राहणार नाही. दिग्दर्शक रिभु दासगुप्ता यांनी ज्याप्रकारे या चित्रपटाची मांडणी केली आहे ती पाहताना सतत काही राहून गेल्यासारखे वाटायला लागते. अमुक एखादी गोष्ट मग अशी का दाखवली, त्या मागचे लॉजिक काय आहे असे प्रश्न पडायला लागतात. त्याची उत्तरं चित्रपटात शोधायला जाल तर निराश झाल्याशिवाय राहणार नाही.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला द गर्ल ऑन द ट्रेन चित्रपट सुरुवातीचा काही काळ उत्कंठा वाढवतो. नंतर त्या कथेची मांडणी इतकी अशक्त झाली आहे की त्यामुळे नेमकं दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हे कळत नाही. या चित्रपटात परिणीती चोप्रा, अदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी, अश्विनी तिवारी, तोता रॉय चौधरी यांच्या भूमिका आहेत. मीराला अॅम्नेशियाचा आजार आहे. असे सांगितले जाते. ती साध्या साध्या गोष्टी विसरते. त्यामुळे तिच्या नव-याला शेखरला ( अविनाश तिवारी) तिचा राग आहे. दुसरीकडे मीरा ज्या ट्रेननं प्रवास करते त्यावेळी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसतात. अर्थात तो तिचा भास आहे की त्या ख-या आहेत. हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

मीरा दारुच्या आहारी गेली आहे. तिचे दारुचे प्रमाण एवढे वाढले आहे की, त्यामुळे शेखरनं तिच्यापासून घटस्फोट घेतला आहे. अर्थात मीराला याचा मोठा धक्का बसला आहे. वकिल म्हणून ती प्रसिध्द आहे. एका खटल्यात तिच्या युक्तिवादामुळे बग्गा नावाच्या एका गुंडाला शिक्षा होते. तो तेव्हापासून तिच्यावर राग धरुन बसला आहे. यासगळ्याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या बग्गाचा मोठा संदर्भ चित्रपटाच्या उत्तरार्धात पाहायला मिळतो. दरम्यान नुसरत (आदिती हैदर अली) ची इंट्री आहे. तिची महत्वाची भूमिका यासगळयात पाहायला मिळते. पुढे नुसरतचा खून होतो आणि चित्रपट वेगळ्या वळणावर येऊन थांबतो.

आता नुसरतचा खून कोणी केला असा प्रश्न प्रेक्षकांसमोर उपस्थित होतो. त्याचे उत्तर शोधण्यात दिग्दर्शकानं बराच वेळ घालवला आहे. त्यात अनेकदा तार्किकता नावाचा प्रकार बाजूला ठेवला आहे. संशयाची पहिली सुई ही मीरावरच आहे. तिचे वागणे, तिचा आक्रस्ताळेपणा हे सारं तिला आरोपी ठरवण्यास पुरेसं आहे. अशावेळी कथानक ज्या पध्दतीनं टर्न घेतं ते पाहून थोडं चक्रावल्यासारखं व्हायला होईल.

ब-याच दिवसांनंतर परिणितीचा चांगला अभिनय या चित्रपटात पाहायला मिळाला आहे. तिचे चाहते नसणा-यांनाही तो आवडेल अशी आशा आहे. इतर कलाकारांच्या वाट्याला कमी वाव मिळाला आहे. आदिती हैदरनं छोट्याशा भूमिकेत प्रभावी काम केलं आहे. गाणीही बरी आहेत. लंडनमध्ये चित्रिकरण झालेल्या या चित्रपटात दिग्दर्शकानं अनेक प्रश्नांना वा-यावर सोडल्याचे दिसून येते. त्यामुळे चित्रपट संपल्यानंतरही काहीही दाखवलं आहे राव, असं तुम्ही म्हटल्याशिवाय राहणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT