hemangi kavi, hemangi kavi post, vatapournima
hemangi kavi, hemangi kavi post, vatapournima SAKAL
मनोरंजन

Hemangi Kavi: माझ्यासारखी संस्कृतीबुडवी बाई.. वटपौर्णिमा होताच हेमांगीची सणसणीत पोस्ट

Devendra Jadhav

Hemangi Kavi post on Vatapournima News: काल वटपौर्णिमा झाली. अनेक महिलांना वटपौर्णिमेचं व्रत ठेवलं. अशातच याच वटपौर्णिमावर हेमांगी कवीने एक पोस्ट लिहिली आहे. हेमांगी कवी अनेक विषयांवर सोशल मीडियावर व्यक्त होत असते.

अशातच हेमांगीने तिला वटपौर्णिमेचा जो अनुभव आला त्याबद्दल भाष्य केलंय. हेमांगीच्या या पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

(hemangi kavi post on vatpournima experience )

हेमांगी लिहिते.. काल #वटपौर्णिमा होती. परवा रात्री shooting ला late pack up झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते.

तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ photo पाठवले होते.

मी reply करत म्हटलं ‘हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!’ त्यावर त्याचा काहीच reply आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!

हेमांगी पुढे लिहिते.. "थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, ”ते photo कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा biscuit खाल्लंय”.

त्यावर त्याने “अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना Social Media वर. त्यासाठी reference म्हणून photo पाठवले. Post च्या खाली टाकता येतील तुला” म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला."

हेमांगी पुढे लिहीते.. "नवऱ्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!

मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, “Happy वटपौर्णिमा!”

Hehe! त.टी.: कालच ही post टाकणार होते पण मंडाळातील काही अति संवेदनशील सदस्यांच्या भावना जपत

‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी!" अशी सणसणीत पोस्ट हेमांगीने केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT