Hina Khan Actress Hospitalized Due
Hina Khan Actress Hospitalized Due esakal
मनोरंजन

Hina Khan Hospitalised : प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान रुग्णालयात, नेमकं झालं काय?

युगंधर ताजणे

Hina Khan Actress Hospitalized Due : टीव्ही मनोरंजन आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

हिनानं आपल्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन याबाबत माहिती दिली आहे. तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हिनाला ताप आल्यानं तिला अॅडमिट करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तिनं तिचे रुग्णालयातील फोटो देखील यावेळी शेयर केले आहेत. त्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत हिनाला काळजी घेण्यास सांगितले आहे.

हिनानं तिच्या इंस्टा अकाउंटवरुन शेयर केलेला फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा विषय आहे. हिनाला १०२ एवढा ताप असल्याचे तिनं म्हटले आहे. गेल्या चार रात्री मी काही झोपलेले नाही. मी तापानं खूप बेजार आहे. ताप काही कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. अशातच मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. खूपच अशक्तपणा आला आहे. असेही हिनानं म्हटले आहे.

हिनाच्या प्रोजेक्टविषयी पाहायचे झाल्यास तिचा कंट्री ऑफ ब्लाईंड नावाचा चित्रपट २०२४ च्या ऑस्करसाठी नॉमिनेट झाल्याचे बोलले जात आहे. त्यात तिनं केलेली भूमिका चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का सेन, शोएब निकाश शहा, नमिता लाल, इनाम उल हक, प्रद्युम्न सिंग मॉल आणि जितेंद्र राय यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT