adesh bandekar home minister  sakal
मनोरंजन

दिव्यांग कलाकारांनी विणलीय ११ लाखांची पैठणी.. अजूनही सुरु आहे काम..

झी मराठीवरिल होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या 'महा मिनिस्टर' या पर्वात महाविजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. ही पैठणी दिव्यांग कलाकारांनी विणली आहे.

नीलेश अडसूळ

Entertainment news : गावागावात आणि घराघरात पोहोचलेल्या 'झी' मराठी (zee marathi) वाहिनीवरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने १७ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. केवळ राज्यातच नाही तर देशभरात जाऊन या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली. सध्या या कार्यक्रमाचे १८ वे वर्ष सुरु असून यंदा नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. हे पर्व 'होम मिनिस्टर' ( home minister ) नसून 'महामिनिस्टर' असणार आहे. या पर्वाच्या महाविजेतीला ११ लाखांची पैठणी मिळणार आहे. (11 lakh paithani)

हे पर्व ११ एप्रिल पासून सुरु झाले. ही ११ लाखांची पैठणी मिळवणे सोपे नाही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात हा पैठणीचा खेळ आदेश बांदेकरांसोबत (adesh bandekar) सु्रु आहे. त्यातून जी महाविजेती ठरेल तिला हा ११ लाखांच्या पैठणीचा बहुमान मिळणार आहे. या पैठणीबाबत दिवसेंदिवस वेगवेगळा खुलासा होत आहे. या पैठणीला संपूर्ण सोन्याचा पदर असून, त्यावर खरे हिरे मढवण्यात येणार आहे. ही पैठणी खरे रेशीम वापरून विणण्यात आली आहे. ऐकून धक्का बसेल पण ही पैठणी विणण्यासाठी तब्बल ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

हो हे खरे आहे. ही पैठणी विणण्याचे काम येवल्यातील कापसे पैठणी यांच्या कार्यशाळेत अद्यापही सुरु आहे. गेली चार महिने तिथले कलाकार ही पैठणी विणत असून काम पूर्ण होण्यासाठी अजून एक महिना लागणार आहे. विशेष म्हणजे ही पैठणी दिव्यांग कलाकारांनी विणली आहे. कापसे यांच्याकडे १७० कलाकार हे दिव्यांग आहे. कुणाला बोलता येत नाही, कुणाला ऐकता येत नाही, कुणाला शारीरिक व्याधी आहेत. अशा दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन ही पैठणी विणली जात आहे.

याविषयी कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे सांगतात,' जवळपास पाचमहिने ही पैठणी विणण्यासाठी लागणार आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा यासाठी आम्ही त्यांना पैठणी विणण्याचे प्रशिक्षण दिले. आज १७० दिव्यांग कलाकार आमच्याकडे पैठणी विणतात. संपूर्णतः हात मागावर ही पैठणी विणली जाते. या दिव्यांग कलाकारांच्या राहण्याची, शिक्षणाची सोय आम्ही करतो, त्यांची पूर्ण काळजी घेतो. या माध्यमातून त्यांनाही हक्काचा रोजगार मिळला आहे.' असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT