बारसं झालं.. काय आहे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचं नाव.. | Priyanka Chopra and Nick Jonas name their daughter Malti Marie Chopra Jonas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra and nick jonas  daughter's name 'malti marie'

बारसं झालं.. काय आहे प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या मुलीचं नाव..

Bollywood news: बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) कायमच चर्चेत असते. मध्यंतरी सरोगसीच्या वादात ती अडकली होती. कारण काही महिन्यापूर्वीच तिनं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीला जन्म दिला होता. यावेळी सरोगसी योग्य की अयोग्य वरून बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. परंतु प्रियांका ही पहिल्या पासूनच आपल्या भूमिका आणि विचारांवर ठाम असणारी अभिनेत्री असल्याने तिने याकडे दुर्लक्ष केले. आता चर्चा तिच्या मुलीच्या नावाची आहे.

हेही वाचा: 'तात्या विंचू', धनंजय मुंडेंचा 'मनसे' समाचार

प्रियंका आपल्या मुलीचे नाव काय ठेवले याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर प्रियंका चोप्रा आणि निक जोनास (nick jonas) यांनी त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले आहे. त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास ( Malti Marie ) असे ठेवले आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या १५ जानेवारी रोजी सॅन दिएगो रुग्णालयात त्यांच्या मुलीने जन्म घेतला. प्रियांका आणि निक जोनास यांनी 22 जानेवारी रोजी इंस्टाग्राम अकाउंटवरून ते पालक झाल्याचे जाहीर केले . (Priyanka Chopra and Nick Jonas name their daughter Malti Marie Chopra Jonas)

"आम्ही सरोगसीच्या माध्यमातून मुल जन्माला घातले असून त्या बाळाचे संगोपन करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही त्या बाळाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. " अशी पोस्ट प्रियांका आणि निक यांनी तेव्हा शेअर केली होती. आता मुलीच्या नावाबाबतही त्यांनी स्पष्टता दिली आहे. हे नाव काहीसे खास असल्याची चर्चा आहे. कारण हिंदू आणि ख्रिश्चन धर्माचा मेळ साधणारे हे नाव आहे. 'मालती' हे नाव मूळ संस्कृत नाव आहे आणि त्याचा अर्थ लहान सुवासिक फूल किंवा चंद्रप्रकाश असा होतो. 'मेरी' हे लॅटिन भाषेतील नाव असून 'समुद्राचा तारा' असा त्याचा अर्थ आहे. तसेच येशूच्या आईचे नावही मेरी होते. त्यामुळे हे नावही विशेष ठरले आहे.

Web Title: Priyanka Chopra And Nick Jonas Name Their Daughter Malti Marie Chopra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top