painful story of dubbing artist sachin gole
painful story of dubbing artist sachin gole sakal

KGF 2 : सुपरस्टार यशला अवाज देणाऱ्या सचिन गोळेची संघर्षमय कहाणी, एकेकाळी खाण्याचीही..

'KGF 2' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी सुपरस्टार यशला आवाज देणारा सचिन गोळे अत्यंत खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहोचला आहे.

सध्या बॉलीवूडचाही रेकॉर्ड मोडून टॉलीवूडने (tollywood news) आपला डंका जगभरात वाजवला आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील रंजकतेमुळे हे चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. हे चित्रपट भारतभरात पाहिले जावे यासाठी त्यांचे हिंदीत डबिंग केले जाते. त्यामुळेच दाक्षिणात्य चित्रपट आपल्याकडे हिट ठरत आहेत. अगदी मध्यंतरी आलेला बाहुबली, पुष्पा हे चित्रपट देखील आपल्याक्सडे हिंदीतूनच पाहिले गेले. 'बाहुबली' (bahubali) मध्ये अभिनेता शरद केळकर याने प्रभासला आवाज दिला होता तर 'पुष्पा' (pushpa) मध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने अल्लू अर्जुनला आवाज दिला होता. या चित्रपटांइतकेच्या त्याच्या डबिंगचेही कौतुक झाले. आता चर्चा 'KGF 2' ची आहे.

painful story of dubbing artist sachin gole
Photo : वुलन टॉप मध्ये सोनाली दिसतेय लल्लन टॉप... पहा, सोनालीचे खास फोटो..

या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. याही चित्रपटाचे डबिंग उत्तमझाले आहे. या चित्रपटात 'रॉकी भाई' ला म्हणजे सुपरस्टार यश (superstar yash) ला कोणी आवाज दिला असा अनेकांना प्रश्न होता, परंतु हा आवाज देणारा कोणी अभिनेता किंवा सुपरस्टार नसून एक सामान्य कलाकार आहे. जो गेली १४ वर्षे या क्षेत्रात टिकण्यासाठी संघर्ष करतो आहे. 'सचिन गोळे' (sachin gole) असं या कलाकाराचं नाव आहे. हे नाव तुम्ही कधीही ऐकलं नसेल पण सध्या याच नावाची अधिक चर्चा आहे.

painful story of dubbing artist sachin gole
थोडक्यात वाचले नाहीतर माझा चेहरा.. ऋतुजा बागवेचा अपघात..

कारण सचिनने या क्षेत्रात येण्यासाठी, काम मिळवण्यासाठी अपार कष्ट घेतले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एकेकाळी सचिनला राहायला घर नव्हते की मुंबई उदरनिर्वाहासाठी पैसे. तो 14 वर्षांपासून या क्षेत्रात धडपडतो आहे. २००८ मध्ये त्याने आपल्या डंबिंगच्या प्रवासाला सुरवात केली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, 'अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मी मुंबईत आलो. या प्रवासात घरच्यांनीही खूप साथ दिली. मात्र मुंबईत आल्यानंतर माझा खरा संघर्ष सुरू झाला. मला काम मिळत नव्हतं, राहायला पैसे नव्हते. अशातच माझा मित्र अनिल म्हात्रे याने मला डबिंगची माहिती दिली. हळूहळू मला डबिंग इंडस्ट्रीतील (dubbing industry) बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. यादरम्यान मी बँकेतही नोकरी करत होतो. होम लोनच्या कामासाठी फिल्डवर जावं लागत होतं. मात्र मी फक्त हजेरी लावून साऊंड स्टुडिओमध्ये येऊन बसायचो.' (painfull story of dubbing artist sachin gole)

'माझा हा प्रकार एके दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजला. त्यावेळी, तुला जे काम करायचं आहे, ते मनापासून कर असा सल्ला त्यांनी दिला. आणि त्याच दिवसापासून डंबिंग मध्ये पूर्णवेळ काम करण्याचा मी निर्णय घेतला. शिवाय सहा-सात महिन्यांत काहीच करू शकलो नाही तर गावी परत जाईन असेही ठरवले होते. पण मला डबिंगची छोटी-मोठी कामं मिळत गेली,' अशी माहिती त्याने दिली.

पुढे तो म्हणाला, 'माझ्या उच्चारांवर मी खूप मेहनत घेतली. भाषेवर प्रभुत्व मिळवलं. एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी मी अभिनेता धनुषला माझा आवाज दिला होता. तिथून खरी सुरुवात झाली. हळूहळू धनुषच्या इतरही चित्रपटांसाठी मी डबिंग करू लागलो. त्याच्या ‘मारी’ या चित्रपटातील माझ्या डबिंगचं खूप कौतुक झालं', असं त्याने पुढे सांगितलं.

'केजीएफ 2 साठी इतरही डबिंग आर्टिस्ट्सचे ऑडिशन घेण्यात आले होते. मात्र माझा आवाज त्यांना खूप आवडला.या चित्रपटाने मला वेगळी ओळख दिली. हा यशातील महत्वाचा टप्पा आहे. या चित्रपटामुळे १४ वर्षे सुरु असलेला संघर्ष संपला.' असे सचिन म्हणतो. या चित्रपटाचे डबिंग अत्यंत चपखल झाल्याने सर्वत्र सचिनचे कौतुक केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com