Huma Qureshi wore red dress in the party, netizens said, she follow urfi javed fashion sakal
मनोरंजन

Huma Qureshi: उर्फी जावेदला फॉलो करतेस काय? हुमा कुरेशी झाली ट्रोल..

'मोनिका ओ माय डार्लिंग'च्या पार्टीत हुमाचा अवतार पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरैशीने आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुंदर अभिनेत्रींमध्ये हुमा कुरेशीचे नाव येणार नाही असे होणार नाही .अभिनया सोबतच हुमा आपल्या लुक्स बाबतीत सुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनते. पण आता हुमा कुरेशी उर्फी जावेदची फॅशन फॉलो करते की काय अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

(Huma Qureshi wore red dress in the party, netizens said, she follow urfi javed fashion)

आपल्या बोल्ड स्टाइलने देखील हुमा चाहत्यांना वेड लावते."मोनिका ओ माय डार्लिंग" चित्रपटाच्या पार्टीमधला तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने बोल्ड ड्रेस फॅशन केली आहे. यावेळी हुमाने रेड कलरचा ड्रेस परिधान केला होता, तशाच सेम ड्रेस पण काळ्या कलरमध्ये विचित्र फॅशन गर्ल उर्फी जावेदनेही परिधान केला होता. या सेम फॅशनमुळे हुमा ट्रोल झाली आहे.

हुमाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोलिंगचा भडिमार सुरू झाला आहे "हुमा तु उर्फीला फॉलो करते की काय?", ''अगं हुमा उर्फीची फिगर कुठे आणि तुझी कुठे", " बहुतेक टेलरकडे एवढाच कपडा होता" अशा कमेंट तिच्या व्हीडिओवर आल्या आहेत.

एक म्हणतो "हुमा हा ड्रेस गरमी मध्ये ठिक आहे आता तर थंडी आहे", तर दुसऱ्याने म्हंटले आहे .. "पण एक समजतं नाही इतक्या टाईट ड्रेसमध्ये ही श्वास कशी घेते आहे. तर काहीना उर्फीची चिंता लागली आहे.तू तिची फॅशन केली तर ती काय करणार असेही अनेकांचे म्हणणे आहे. ''हुमा या अश्या विचित्र फॅशनसाठी आमची उर्फी बेस्ट आहे, तुला नाही जमणार'' अशा अनेक कमेंट्सचा पाऊस तिच्यावर पडला आहे.

हुमा कुरेशी "तरला" आणि "पुजा मेरी जान" या आगामी चित्रपटात दिसणार आहे. "तरला" हा चित्रपट प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांच्यावर आधारित आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT