Suniel Shetty,Plaza Theatre Google
मनोरंजन

एकेकाळी मी इथल्या कॅंटीनमध्ये काम करायचो- सुनिल शेट्टी

प्रणाली मोरे

सुनिल शेट्टी(Suniel Shetty) म्हणजे बॉलीवूडमधलं रांगडं व्यक्तीमत्त्व. पडद्यावर त्याला नेहमीच ढिशूम ढिशूम करताना पाहणं लोकांना आवडायचं. म्हणूनच की काय कोणत्याही अभिनेत्रीसोबतचा त्याचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहणं प्रेक्षकांना पचनी नाही पडायचं. सुनिल शेट्टीने सिनेमांतून तशी लवकरच एक्झिट घेतली असली, तरी त्याने केलेले काही सिनेमे आणि त्यातले त्याचे डायलॉग आजही तोंडात फीट बसले आहेत. आज त्याची दोन्ही मुलं सिनेइंड्स्ट्रीत आली आहेत. त्याची मुलगी अथिया शेट्टीला फारसे सिनेमे अद्याप वाटेला आले नसले तरी त्याचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाचं नाव 'तडप' असून मिलन लुथरिया हे सिनेमाचं दिग्दर्शन करीत आहेत. या सिनेमात अहानसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे.

या सिनेमात अहान हा मसुरीचा राहणारा आहे. पण सिनेमातला पहिला सीन मात्र मुंबईत शूट करण्यात आला. ह्या सीनच्या माध्यमातून मुबंईला मसुरी म्हणून दाखवण्यात आलंय. हा सीन शुट झालाय दादरच्या प्लाझा थिएटरमध्ये. मुलाच्या पहिल्या-वहिल्या फिल्मच्या निमित्ताने सुनिल शेट्टी आणि त्याची पत्नी मना शेट्टीही शुटिंगच्या पहिल्या दिवशी प्लाझा थिएटरमध्ये उपस्थित होते. पण इथे गेल्यावर सुनिल शेट्टीने अचानक मिलन लुथरियाला बाजूला नेले आणि तो अगदी हुंदके देऊन रडू लागला. तेव्हा मिलनने त्याला कारण विचारले असता सुनिल शेट्टी म्हणाला,"या थिएटरमध्येच एक छोटंस कॅंटिन होतं,जिथे काम करीत माझ्या वडिलांनी त्यांचा संसार सुरू केला होता. इथून मिळणा-या पैशांवरच आमचं घर चालत होतं". सुनिल शेट्टीच्या वडीलांचे नाव वीरप्पा शेट्टी असे होते.

Ahan Shetty,Tara Sutaria

मिलन लुथरियाने 'तडप' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सुनिल शेट्टीची ही आठवण शेअर केली. तो म्हणाला,सुनिल शेट्टी प्लाझा थिएटरमध्ये गेल्यावर रडता-रडता मला सांगू लागला. तो म्हणाला,"बघ,नशीब मला पुन्हा त्या ठिकाणी घेऊन आलं जिथे मी लहानपणी वडिलांसोबत यायचो,त्यांना कामात मदत करायचो,तिथे जेवायचो. आज मला माझे ते दिवस आठवले म्हणजे अजुनही मी जमिनीवर आहे याची प्रचिती येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर तुला कुठे माहित होतं माझं प्लाझा थिएटरशी काय नातं आहे ते".

तडप लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. साजिद नाडियादवालाने या सिनेमाची निर्मिती केली आहे. "हा सिनेमा मला माझं काम पाहून मिळालाय,माझ्या टॅलेंटवर मिळालाय,माझ्या वडीलांनी माझं नाव पुढे केल्यामुळे नाही.मी रीतसर ऑडिशन्स दिल्या. अनेक निर्माते-दिग्दर्शकांना भेटलो आणि मग कुठे मला सिनेमा मिळाला" असं अहान शेट्टीनंही आपल्या मुलाखती दरम्यान नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT