Amitabh mentioned the power of films,including Salman Khan's....पण त्याचवेळी अमिताभ यांनी भारत-पाक संबंधांवर बोलताना भाष्य केलंय की,काही गोष्टी ज्या घडतात त्या चांगल्या असतात...Virat Kohli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan,Salman Khan

अमिताभ बच्चन यांना आली सलमान खानची आठवण....

ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सुन होऊन बरीच वर्ष झाली असली तरी आजही सलमानचं नाव निघालं की बच्चन कुटुंबाकडून चुप्पी साधली जाते. सगळेच एकमेकांबद्दल बोलणं टाळतात. पण अर्थात अमिताभ बच्चन म्हणजे 'अ ट्रुली जंटलमन'. त्यांनी मात्र त्यांच्या एका पत्राच्या माध्यमातनं सलमानच्या सिनेमाचं कौतूक करीत त्याला थेट भारत-पाकिस्तान संबंधाशी जोडलंय. यामुळे एवढं तर नक्कीच कळतंय की अमिताभ सलमानचे सिनेमे पाहतात.

हेही वाचा: "कमल हासन नसते तर कदाचित माझं करिअर संपलं असतं"

आज 26 नोव्हेंबर. ही तारीख समस्त भारतीयांना त्या काळ्या दिवसाची आठवण करून देतात ज्यादिवशी पाकिस्ताननं पाठीत खंजीर खुपसून सर्वसामान्य जनतेसोबत रक्ताचा खेळ खेळला. पण भारतानंही आपण कोण आहोत आणि काय करू शकतो याची जाणीव त्यानंतर ब-याचदा पाकीस्तानला करून दिली. आज 13 वर्ष झाली मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्याला. त्या हल्ल्यात पकडल्या गेलेल्या दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षाही झाली. पण अजूनही त्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या त्या सर्वसामान्य लोकांची आठवण झाली की जखम अजून ओलीच आहे असा भास होतो. आज अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरनं त्या दिवसाच्या आठवणीत पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी एक पत्र लिहित सा-या आठवणी जागृत केल्या आहेत. जे एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आलंय.

Virat kohli,Salman Khan

Virat kohli,Salman Khan

अमिताभ यांनी 26 नोव्हेंबर,2011 ला 'डार्क नाइट' संबोधत त्या दिवसाच्या आठवणी जागवताना जागतिक शांती साठी प्रार्थना केलीय. त्यांनी पुढे लिहिलंय,''त्या हल्ल्यात 166 लोकं मृत्युमुखी पडली होती आणि कितीतरी जण जखमी झाले. पण त्यानंतरही आपल्या भारतानं पाकिस्तानविरोधात युद्द नं पुकारता,हल्ल्याची पुनरावृत्ती नं करता आपला संयम ढळू दिला नाही. भारताने आपल्या स्टाइलमध्ये ज्या पद्धतीनं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलंय त्यासाठी हॅट्सऑफ. भारत कोण आहे आणि काय करू शकतो याचा पाकिस्तानला द्यायचा तेवढा धसका भारतानं दिलेला आहे."

हेही वाचा: खान कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत सोनाक्षी लग्न करणार का?

पण त्याचवेळी अमिताभ यांनी भारत-पाक संबंधांवर बोलताना भाष्य केलंय की,काही गोष्टी ज्या घडतात त्या चांगल्या असतात आणि त्यातनं दोन देशातील लोकांमध्ये एकमेकांबद्दलचं प्रेम,माणुसकी शिल्लक आहे हे प्रकर्षानं जाणवतं. नुकत्याच झालेल्या T-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा दुबईत पराभव केला. पण त्या अपयशानंतरही भारताचा कॅप्टन विराट कोहली याने पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवान आणि कॅप्टन बाबर आझम याला आलिंगन दिले. ती गोष्ट दोन देशातला तणाव कमी करण्यासाठी फार महत्त्वाची. इतकंच काय तर 2015 मध्ये सलमान खानच्या बजरंगी भाइजान या सिनेमात एका लहान पाकिस्तानी मुलीला पाकिस्तानात सुखरूप पोहोचवण्यासाठी चाललेली भारतीय माणसाची धडपड हे कथानक दोन्ही देशांमध्ये एकमेकांप्रती विश्वास निर्माण करणारंच होतं.

अमिताभ बच्चन यांच्या या पत्रावर अनेक सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत. अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'चा 13 वा सिझv करीत आहेत. तसंच ब्रम्हास्त्र,उॅंचाई, मे डे,गुड बाय असे त्यांचे अनेक सिनेमे आपल्या भेटीस येणार आहेत.

loading image
go to top