I know what to do;sonali kulkarni सोनालीने मात्र तडक त्यावर म्हटलंय,''एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल असं तुला वाटतंय का?'''Sanjay Jadhav,Sachit Patil Marathi actor,actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni
"एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल का?"; 'अप्सरा' भडकली #sonaleekulkarni#apsara#natrangfame#marathiactress#

"एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल का?"; 'अप्सरा' भडकली

नवीन नवीन लग्न झालेल्या सोनाली कुलकर्णीनं(Sonalee Kulkarni) आता सिनेमातनं दमदार कमबॅक केलंय म्हणायचं. 'झिम्मा' आणि 'पांडू' हे तिचे दोन मोठे सिनेमे आपल्या भेटीला आलेत. 'झिम्मा' प्रदर्शित होऊन सुपरहीटच्या यादीत गेल्याची चर्चा होत असतानाच, 'पांडू' सिनेमातल्या भाऊ कदमसोबतच्या तिच्या गाण्यांनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलाय. विजू माने दिग्दर्शित 'पांडू' हा सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून कुशल बद्रिकेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सोनाली आणि पांडू' सिनेमाची टीम सध्या जोरदार या सिनेमाचं प्रमोशन करीत आहेत.

सोनाली सध्या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने पुणे-मुंबई ते थेट दुबई असा प्रवास करीत आहे. कारण तिचा नवरा कामाच्या निमित्ताने दुबईत असतो,आई-वडील पुण्यात तर शुटिंग ब-याचदा मुंबईतील स्टुडिओत होत असल्या कारणाने तिला मुंबईत राहावं लागतं. नुकताच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. सोनाली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या संदर्भातल्या ब-याच गोष्टी शेअर करीत असते. नव्हे युझर्सनी तिला ट्रोल केलं तरी ती बिनधास्त त्यांच्या कमेंट्सना उत्तरं देताना दिसते. सध्या तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया आल्यात. तर एका युझरने तिला ट्रोल केल्याने,सोनालीने मात्र जरा भडकल्यासारखंच उत्तर दिल्याचं जाणवतंय.

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांना आली सलमान खानची आठवण....

आधीच रंगाने गोरी गोरी पान असलेल्या सोनालीला निसर्गात: काहीसे तपकीरी-सोनेरी केस लाभले आहेत. आणि ती नेहमीच केसाच्या वेगवेगळ्या स्टायलिंगने आपला लूक आणखी खुलेल कसा याबाबतीत प्रयत्नशील असते. सोनाली सध्या पुण्यात आहे. तिथल्याच एका सलोनमध्ये तिनं शूट केलेला व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ती तिचा न्यू हेअरकट आणि ब-याच दिवसांनी केलेला हेअर कलर दाखवित आहे. या व्हिडीओला तिने 'हवा मै उडती जाए' हे कॅप्शन दिलंय. अनेक युझर्सनी तिला चांगल्या कमेंट्स दिल्यात पण एका युझरने तिला कमेंट सेक्शनमध्ये म्हटलंय,'केस कलर करतेय,कळत नाही का,कलर लावल्यामुळे ते खराब होतात.' पण सोनालीने मात्र तडक त्यावर म्हटलंय,''एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल असं तुला वाटतंय का? तुझ्या माहितीसाठी सांगते,मी दोन वर्षांनी हेअर कलर करतेय.''

संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा' या सिनेमात सोनाली आपल्याला दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सचित पाटील आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. 2022 च्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top