Kapil Sharma, Prime Minister Narendra Modi Google
मनोरंजन

कपिल शर्माची हिम्मत पहा;दारुच्या नशेत थेट मोदींना केलं ट्वीट...

नेटफ्लिक्सवरील 'आय अॅम नॉट डन येट' या शोमध्ये सांगितले त्याच्या 'ड्रिंक ट्वीटचे' किस्से

प्रणाली मोरे

कपिल शर्मा(Kapil Sharma) हे नाव आज जगाच्या कानाकोप-यात पोहोचलं ते त्याच्या 'द कपिल शर्मा' या शो मुळे. विनोदाचे चुटकूले मारणं जसं त्याला सहज जमत तसं काहीबाही ट्वीट करून वादात पडणं हे ही त्याच्या हातचा मळ असंच म्हणावा लागेल. आता पहा नं त्याच्या वादाच्या प्रकरणांची लिस्ट काढली तर ब-याचदा ट्वीटरवर टीव टीव केल्यानेच ते वाद झाल्याचं समोर येईल. मग अगदी फराह खानला मॅनरलेस बोलणं असू दे की थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई महानगरपालिकेविरोधात तक्रार करणारं ट्वीट असू दे की दारूच्या नशेत महिला सहकलाकाराची छेड काढणं असू दे की अगदी आपल्या शो मध्ये कलाकांरांवर काहीही जोक्स मारून त्यांचा अपमान करण्याचा प्रसंग ओढवून घेणं असू दे....लिस्ट मोठी आहे,इथेच थांबलेलं बरं,मुद्द्यावर येऊया. तर त्याचं झालं असं की...

कपिल शर्मा म्हणालाय की त्याला ट्वीटरविरोधात तक्रार करायचीय. राजकारणी ट्वीटर अकाऊंटवर काहीही बोलले की त्यांना मुभा आणि मी बोललो की माझ्याविरोधात अॅक्शन हे काय आहे. हे बोलताना त्यानं सांगितलं की,''एकदा रात्री त्यानं एक वादग्रस्त ट्वीट केलं. सकाळी त्याचे गंभीर परिणाम होत आहेत हे लक्षात येताच मुंबई सोडून मालदिवला पळावं लागलं. एक असं हॉटेल गाठलं जिथे मी इंटरनेट नसलेल्या रूम मध्ये ८ दिवस राहिलो. तब्बल ९ लाख रुपये खर्च आला. एवढा खर्च तर मी माझ्या शिक्षणावरही केला नसेल''.

तो पुढे म्हणाला,''ट्वीटरनं मला ट्वीट करण्यावरनं खूप हैराण केलंय. ते जे हा माणसा-माणसांत भेदभाव करतात त्यामुळे ट्वीटरविरोधात मला कोर्टात जायचंय. राजकारण्यांच्या ट्वीटला 'मॅनिप्युलेटेड ट्वीट' म्हणून दुर्लक्षित करायला सांगतात मग माझ्या ट्वीटलाही 'ड्रंक ट्वीट' म्हणून लोकांना दुर्लक्षित करायला सांगायचं नं. हा भेदभाव आता चालणार नाही. आता तुम्ही म्हणाल काय आहे हे. तर थोडं थांबा,सांगतो सविस्तर. नेटफ्लिक्सवरील 'आय अॅम नॉट डन येट' या स्टॅन्ड अप शो मध्ये त्यानं आपल्या लाईफमधले अतरंगी किस्से शेअर केलेयत,जे करावसं वाटतंय ते त्याच्या हटके स्टाइलमध्ये बोलून दाखवलंय. लवकरच आपण हे पाहू शकणार आहात. इथे त्या शो ची छोटीशी झलक जोडत आहोत,जी कपिलनं नेटफ्लिकसला नं सांगता त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. जोक्स ए पार्ट...पण नक्की पहा ही झलक,शो पहायचा मोह कदाचित आवरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT