मनोरंजन

स्टार प्रवाहवरील 'ही' लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

सोशल मीडियावर चर्चा

स्वाती वेमूल

छोड्या पडद्यावरील मालिकांचा चाहतावर्ग मोठा असतो. या मालिकांमध्ये दररोज येणारे नवनवीन वळण, कलाकारांचा अभिनय यांमुळे दिवसागणिक त्याची उत्सुकता वाढत जाते. स्टार प्रवाह Star Pravah वाहिनीवरील काही मालिका आणि त्यातील कलाकार यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. आई कुठे काय करते, फुलाला सुगंध मातीचा, रंग माझा वेगळा, मुलगी झाली हो, सुख म्हणजे नक्की काय असतं?, सांग तू आहेस का या अशा काही मालिकांमुळे ही वाहिनी गेल्या काही महिन्यांपासून आघाडीवर आहे. सध्या सोशल मीडियावर यातीलच एका मालिकेची चर्चा होतेय. ही मालिका म्हणजे 'सांग तू आहेस का?' Sang Tu Aahes Ka ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगतेय. (is this popular marathi serial of star pravah channel to end soon)

या मालिकेच्या निरोपाची चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे नवीन मालिकेचा प्रोमो. स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेचा प्रोमो आला असून त्या मालिकेची वेळ ही रात्री १० वाजता सांगितली जातेय. मात्र रात्री १० वाजता वाहिनीवर 'सांग तू आहेस का' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. 'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका आता रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे.

'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका सुरू झाल्यानंतर 'सांग तू आहेस का?' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या मालिकेत सध्या डॉ. वैभवीला मृत वैभवी आरशात असल्याचा भास होतो. मृत वैभवीची सुटका डॉ. वैभवी कशी करणार, हे आगामी भागात पाहायला मिळेल.

दुसरीकडे 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतून अभिनेता भूषण प्रधान एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य देव हा बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे. तर भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Video Viral: क्रिकेटच्या मैदानात बाप-लेक भिडले! नबीच्या पहिल्याच चेंडूवर मुलानं मारला खणखणीत सिक्स

Ahmedabad Plane Crash: ''इंधन पुरवठा नियंत्रकात त्रुटी नाही'', एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर

Walmik Karad: वाल्मिकच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला पण मालमत्तेचं काय होणार? उज्ज्वल निकम केस लढणार का?

ENG vs IND: इंग्लंडच्या ओपनर्सला का फैलावर घेतलं? शुभमन गिलने केली पोलखोल; त्यांचा रडीचा डाव जगासमोर आणला

SCROLL FOR NEXT