Jiah-Khan-and-Sooraj-Pancholi
Jiah-Khan-and-Sooraj-Pancholi 
मनोरंजन

जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीची पुन्हा चौकशी नाही

वृत्तसंस्था

मुंबई - जिया खान आत्महत्याप्रकरणात पूर्वाश्रमीचा प्रियकर अभिनेता सूरज पांचोली याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी त्याची आणखी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जियाची आई राबिया खान यांनी केली होती.  मात्र, याबाबतची याचिका सीबीआय न्यायालयाने फेटाळली असून, या प्रकरणात यापुढे कोणताही तपास केला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायलयाने दिला आहे.  

जियाच्या मृत्यूनंतर सूरज आणि त्याचे वडील अभिनते आदित्य पांचोली यांच्यावर बरेच आरोप लावण्यात आले होते. याप्रकरणाबाबत आणखी चौकशी होणार नसली तरी, सूरज आणि जियादरम्यान ब्लॅकबेरी मेसेंजरवरुन झालेले बोलणे न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत.

जिया खानने 3 जून 2013 रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी अभिनेता सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याची जामिनावर सुटका झाली होती. जुलै 2014 मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. याप्रकरणी सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोपपत्र सीबीआयने दाखल केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT