joker film sequel
joker film sequel 
मनोरंजन

ऑस्करवर मोहोर उमटवणा-या 'जोकर'च्या सिक्वेलची तयारी, अभिनेता वॉकिन फीनिक्सने सिक्वेलसाठी केली तब्बल एवढ्या कोटींची डिल

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  टॉड फिलिप्स यांचं दिग्दर्शन असलेला हॉलीवूड सिनेमा 'जोकर' २०१९ या वर्षातील सगळ्यात ब्लॉकबास्टर सिनेमा होता. आपल्या जबरदस्त अभिनयाने जगभरात प्रेक्षकांवर छाप पाडणारा अभिनेता वॉकिन फीनिक्स लवकरंच 'जोकर'च्या सिक्वेलसोबत पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  होय. रिपोर्ट्सनुसार अभिनेता वॉकिनला 'जोकर'च्या दोन सिक्वेलसाठी ५० मिलियन डॉलर म्हणजेच ३६७ कोटी रुपयांची डिल ऑफर केली गेली आहे.  

'जोकर' सिनेमाच्या सिक्वेलचा दिग्दर्शक, अभिनेता  किंवा निर्मांत्यांनी काहीच ठरवेलं नव्हतं मात्र सिने समीक्षक आणि व्यावसायिक दृष्या मिळालेल्या यशानंतर वॉकिन आणि टॉड दोघेही 'जोकर'च्या सिक्वेलची हिंट देत होते. वॉकिन फीनिक्सने या सिनेमातील त्याच्या जबरदस्त अभिनयाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळवला होता. ऑस्करमध्ये या सिनेमाला वेगवेगळ्या अशा ११ विभागांमध्ये नामांकन मिळालं होतं. हा पहिला सिनेमा R रेटेड (१७ वर्षांखालील मुलांसाठी बंदी असलेला) सिनेमा होता ज्याने एक बिलियनपेक्षा जास्त कमाई केली होती. 

द मिररच्या वृत्तानुसार, वॉकिन फीनिक्सने पहिले 'जोकर'ला एक स्टँड अलोन सिनेमा मानला होता. मात्र त्याचा हा विचार आता बदलला आहे. गेल्या वर्षी झालेल्या वादविवादानंतरही ही भूमिका त्याला पडद्यावर पुन्हा एकदा साकारायची आहे. सिनेमाच्या सुत्रांकडून कळतंय की अजुन यावर चर्चा सुरु आहे.स्क्रिप्ट्स लिहिल्या जात आहेत आणि वॉकिन यात खूप बिझी आहे. दिग्दर्शक टॉड फिलिप्स, अभिनेता वॉकिन फीनिक्स आणि निर्माता ब्रॅडली कूपरसोबत त्यांची लाँग टर्म कमिटमेंट असल्याने ते पुढच्या चार वर्षात 'जोकर'चे दोन सिक्वेल्स आणण्याचा विचार करत आहेत.   

joaquin phoenix to sign 367 crore deal for two joker sequels report  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT