संगीतकार इस्माइल दरबार यांनी केलं कन्फर्म, मुलगा जैद करतोय गौहर खानला डेट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 19 September 2020

गौहर आणि जैद यांच्या इंस्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोंचा भडिमार देखील पाहायला मिळतो. हेच सगळं पाहून असा अंदाज वर्तवला जात होता की कदाचित हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गौहर खान आणि संगीतकार इस्माइल दरबार यांचा मुलगा जैद दरबार यांच्यामधील जवळीक चर्चेत होती. जैदने काही दिवसांपूर्वीच गौहरला तिच्या बर्थडे दिवशी एक खास सरप्राईज देखील दिलं होतं आणि मोठ्या दिमाखात बर्थ डे सेलिब्रेट केला होता. दोघं अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. इतकंच नाही तर गौहर आणि जैद यांच्या इंस्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोंचा भडिमार देखील पाहायला मिळतो. हेच सगळं पाहून असा अंदाज वर्तवला जात होता की कदाचित हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

हे ही वाचा: बिग बींची 'ही' हातमिळवणी चर्चेत, लोक म्हणतायेत अरे हा तर अंडरवर्ल्डचा 'डॉन' मात्र अभिषेकने सांगितलं फोटोमागचं सत्य  

गौहर खान आणि जैद दरबार यांच्या अफेअरच्या चर्चांना जैदचे वडिल आणि प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी या दोघांच्या नात्याविषयी कन्फर्मेशन देत म्हटलं आहे की, 'माझा मुलगा जैद गौहर खानला डेट करतोय आणि जैदला तिच्यासोबत लग्न देखील करायचं असेल तर आमचे आशिर्वाद त्याच्यासोबत नक्कीच असतील. एवढंच नाही तर गौहर सोबतची रिलेशनशिप सांगण्यासाठी जैदने सर्वात आधी त्याच्या सावत्र आईला फोन करुन सांगितलं होतं आणि म्हणाला होता की त्याला गौहर खूप आवडते.'

जैद त्याचे वडिल इस्माइल दरबार यांच्यासोबत राहत नाही. मात्र याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले. 'कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है केहना. माझं माझ्या मुलांसोबत एका बाप मुलासारखंच नातं आहे जसं इतरांच्या वडिल मुलांचं असतं. त्यांनी सांगितलं की जैदने त्याची सावत्र आई आयेशासोबत याबाबत बातचीत केली होती आणि तो गौहरची खूप स्तुती करत होता. जैद २९ वर्षांचा आहे आणि त्याला माहित आहे की तो काय करतोय. आयेशाने देखील त्याला हेच सांगितलं की जर तो खुश आहे तर आम्हीपण खुश आहोत.'

संगीतकार इस्माइल दरबार यांनी दोन लग्न केली आहेत. पहिलीचं नाव फरजाना जी जैदची आई आहे आणि दुसरी आयेशा. पहिल्या पत्नीपासून इस्माइल यांना चार मुलं आहेत तर दुस-या पत्नीपासून एक. मात्र त्यांनी सगळ्या मुलांच्या तेवढेच जवळ असल्याचं सांगितलं.   

music composer ismail darbar confirms son zaid relationship with gauahar khan  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: music composer ismail darbar confirms son zaid relationship with gauahar khan