Joram Movie trailer Manoj Bajpayee esakal
मनोरंजन

Joram Trailer : मनोज वाजपेयीचा एवढा खतरनाक चित्रपट यापूर्वी कधी पाहिला नसेल! 'जोराम' चा ट्रेलर पाहून होईल बोलतीच बंद

प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीचा कोणताही नवा चित्रपट अथवा वेबसीरिज यायची झाल्यास त्याची होणारी चर्चा मोठी असते.

युगंधर ताजणे

Joram Movie trailer Manoj Bajpayee : प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीचा कोणताही नवा चित्रपट अथवा वेबसीरिज यायची झाल्यास त्याची होणारी चर्चा मोठी असते. याशिवाय त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी त्याच्या द फॅमिली मॅन या राज डीके सीरिजनं प्रेक्षकांना खूश केले होते. त्याचे आतापर्यत दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. Joram Trailer Release Manoj Bajpayee looks intense

आता मनोज वाजपेयीच्या आगानी जोराम नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला मिळालेला नेटकऱ्यांचा प्रतिसाद मोठा आहे. त्याची चर्चाही रंगली आहे. देवाशीष मखीजा यांनी दिग्दर्शित केलेला जोराम यापूर्वी जगभरातील वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला असून त्याचे समीक्षक, परिक्षक आणि प्रेक्षक यांनी खूप कौतुकही केले आहे.

Financial Freedom महिलांना का हवे कुटुंबाच्या गुंतवणुकींचे आणि आर्थिक व्यवहारांचे ज्ञान?

या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयी तीन वर्षाच्या मुलीच्या वडिलांची भूमिका केली असून जो आपल्या मुलीला वाचविण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरताना दिसतो. मुलीसाठी तो काहीही करायला तयार होतो. वेळप्रसंगी पोलिसांशी लढाही देतो असे त्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

यापूर्वीच्या काही व्हायरल मुलाखतीमध्ये मनोजनं त्याच्या या चित्रपटाविषयी सांगितलं होतं की, या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे. जोरामचा भाग मला होता आलं याचा खूप आनंद आहे. या चित्रपटातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हा चित्रपट कित्येक वास्तव घटनांवर बोट ठेवतो. तसेच झिशाननं म्हटलं होतं की, या चित्रपटामध्ये मी एका शहरातील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याचे नाव रत्नाकर असे आहे.

आपल्या देशातील नागरिकांचा सामाजिक स्तर, त्यांची सांस्कृतिकता या साऱ्या गोष्टींवर जोराम हा प्रभावीपणे भाष्य करतो असे मला वाटते. हा चित्रपट एकाचवेळी खूप साऱ्या गोष्टींविषयी बोलून जातो. त्यातून खूप काही आपल्याला नव्यानं कळतं. जाणवतं. हा चित्रपट माझ्यासाठी मोठा अनुभव होता. असेही झिशाननं यावेळी सांगितले. मला आशा आहे की, चाहते हा चित्रपट पाहून वेगळ्या प्रकारे विचार करु लागतील.

मखीजा फिल्मस यांच्यावतीनं जी स्टुडिओ द्वारा जोरामची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबे आणि मेघा माधूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. यासोबतच तनिष्का चॅटर्जी आणि राजश्री देशपांडे यांच्या भूमिका लक्षवेधी आहेत. हा चित्रपट येत्या आठ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RaJ-Uddhav Thackeray : मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधुंचा 'मराठी'चा डाव, कॉंग्रेस नेते संभ्रमात; नेमकं काय घडलं?

Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीने वडिलांचा 'तो' सल्ला ऐकला नाही अन् पुढे इतिहास घडला...

Pune News : तो धावत गेला आणि खिडकीत अडकलेल्या चिमुकलीचा जीव वाचवला.. कात्रजमध्ये युवकाचे धाडसी कृती

Akash Deep: जो रूटचा त्रिफळा उडवणारा तो चेंडू No Ball? MCC ने दिला निर्णय; पुढच्या सामन्यात आकाश दीप खेळू शकेल का?

Latest Maharashtra News Updates : विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवल्याने सरकार विरोधात विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन

SCROLL FOR NEXT