Kareena Kapoor
Kareena Kapoor Sakal
मनोरंजन

Kareena Kapoor Lohri Celebration: कपूर सिस्टर्सने या प्रकारे घरीच साजरी केली लोहरी

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण देशाने 13 जानेवारी रोजी 'लोहरी' हा सण साजरा केला. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना मोठ्या थाटामाटात लोहरी साजरी केली. करीना कपूर खाननेही चाहत्यांना मिठाईच्या थाळीने लोहरीच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटोही शेअर केला आहे.

करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लोहरी सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. शेंगदाणे आणि गुळाचा हलवा सोबत तीळ चिक्कीने भरलेल्या थाळीचा फोटो तिने शेअर केला आहे. सोबत हॅप्पी लोहरी असे लिहिले आहे.त्याचवेळी करिश्मा कपूरनेही मिठाईची झलक दाखवली. दोघांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून सण साजरा केल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, सारा अली खान आणि इब्राहिम अली खान देखील त्यांचे वडील सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यासोबत शुक्रवारी त्यांच्या मुंबईतील घरी दिसले. बांद्रा येथे त्यांचे वडील सैफ आणि त्यांची दुसरी पत्नी करीनाच्या घरी या भावंडांनी लोहरी साजरी केली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, साराने पांढरा क्रॉप टॉप आणि गुलाबी शॉट्ससह रंगीत प्रिंट जॅकेट घातले होते. तर इब्राहिमने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि पांढरी पँट घातली होती. त्याच्या हातात स्क्रिप्ट असल्याचंही दिसत होतं.

kareena kapoor

करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच हंसल मेहताच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री याआधी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुलगा जेहसोबत यूकेला रवाना झाली होती. गेल्या वर्षी तिने शूटिंग पूर्ण केले होते.

करिनाने जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' देखील केले आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय करीना कपूर खान रिया कपूरच्या 'द क्रू'मध्ये तब्बू आणि क्रिती सेनॉनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT