Kareena Kapoor Khan’s pair with Prabhas, master plan of the director of ‘Kabir Singh’ Google
मनोरंजन

कबीर सिंगच्या दिग्दर्शकाचा मास्टर प्लॅन, प्रभाससोबत जमवली करिनाची जोडी,वाचा

करिना कपूर प्रभाससोबतच्या या सिनेमातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार असल्याची मोठी बातमी आहे.

प्रणाली मोरे

'बाहुबली' फेम प्रभास (Prabhas)सध्या आपल्या टॉलीवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सध्या तो 'सलार' आणि 'प्रोजेक्ट K' सिनेमाची तयारी देखील करत आहे. यादरम्यानच आता त्याच्या आणखी एका नव्या सिनेमाची अपडेट समोर आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रभास आता बॉलीवूडची मोठी अभिनेत्री करिना कपूर(Kareena Kapoor) सोबत दिसणार आहे,ज्यामुळे चाहत्यांना देखील सुखद धक्का बसला आहे. बोललं जात आहे की करीना कपूर साउथ सुपरस्टार प्रभाससोबत तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण देखील करण्याची शक्यता आहे. चला,त्या बिग बजेट सिनेमाविषयी जाणून घेऊया.(Kareena Kapoor Khan’s pair with Prabhas, master plan of the director of ‘Kabir Singh’)

'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक गेल्या काही दिवसांत आपल्या 'अॅनिमल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोबतच तो प्रभाससोबत 'स्प्रिट' हा एक मोठा सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येण्याच्या तयारीत देखील आहे. या सिनेमाविषयी चर्चा आहे की प्रभास सोबत या सिनेमात करिना कपूरची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. असं पहिल्यांदाच होणार आहे जिथे प्रभास आणि करीना एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. सध्या बातम्यांवर अधिकृतरित्या काही बोललं गेलेलं नाही.

सध्या प्रभास हैदराबादमध्ये आपला आगामी सिनेमा 'प्रोजेक्ट के' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण आणि प्रभासची जोडी आपल्याला पहायला मिळेल. यामध्ये अमिताभ बच्चन देखील आहेत. तर करिना कपूरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर आता ती पुन्हा कामावर परतलीय.

करिना कपूरनं ब्रेकनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ती 'डिव्होशन ऑफ सस्पेक्ट' या सिरीजमध्ये काम करतेय. तिच्यासोबत या सिरीजमध्ये जयदीप अहलावत आणि विजय वर्मा अशी स्टारकास्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment 2026 : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्ताची प्रतीक्षा संपली! 30 ऑक्टोबरला जमा होणार 2000 रुपये? खात्यात पैसे येण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम

KBC Marathi: तू चूक मान्य केलीस म्हटल्यावर... गौतमी पाटीलने माधुरी दीक्षित समोर दिली त्या गोष्टीची कबुली; अभिनेत्री म्हणाली-

IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! न्यूझीलंडमध्ये मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, बांगलादेशी-पाकिस्तानी गार...

Latest Marathi News Live Update : ऑडिओ क्लिप आरोपावर मनोज जरांगे यांची रामदास कदमांवर टीका

Venus Transit Astrology : शुक्राचे 'चित्रा' नक्षत्रात आगमन; मेषसह 4 राशींच्या आयुष्यात होणार धनवर्षाव, करिअरमध्येही मोठी प्रगती

SCROLL FOR NEXT