सुश्मिता सेनच्या भावाला घटस्फोट का देतेय चारु असोपा? व्हिडीओतून मोठा खुलासा Charu Asopa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Charu Asopa Opens Up About Her Decision To Divorce Rajeev Sen...post a video

सुश्मिता सेनच्या भावाला घटस्फोट का देतेय चारु असोपा? व्हिडीओतून मोठा खुलासा

गेल्या काही महिन्यांपासून राजीव सेन (Rajiv Sen) आणि चारु असोपा(Charu Asopa) विभक्त(Divorce) होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण प्रत्येकवेळेला हे कपल त्या बातम्या अफवा आहेत हे दाखवण्यासाठी एकमेकांसोबतचे फोटो,व्हिडीओ पोस्ट करायचं अन् बातमीवर पांघरुण घालायचा प्रयत्न करायचे. पण काही दिवसांपूर्वी चारुने एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाच्या बातम्यांवर मौन सोडलं. तिनं सांगितलं की ती राजीव सेनला घटस्फोट देत आहे. पण आता अभिनेत्रीनं आपल्या घटस्फोटा संदर्भात एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत चारूने आपल्या विषयी लोकांच्या मनात उठलेल्या प्रश्नांना एकप्रकारे उत्तरच दिले आहे.(Charu Asopa Opens Up About Her Decision To Divorce Rajeev Sen...post a video)

हेही वाचा: कॉफी विथ करण 7: रणवीरचा सेक्स लाईफवर मोठा खुलासा, म्हणाला,'व्हॅनिटीतही...'

चारू असोपा छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आणि आता ती Vloger देखील बनली आहे. यामुळे जेव्हा तिने तिच्या आणि राजीव सेनच्या घटस्फोटावर भाष्य केलं,तेव्हा सगळीकडेच त्याचा बोलबाला झाला. लोकांच्या मनात चारुविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत,ज्याचं उत्तर अभिनेत्रीनं आपल्या व्हिडीओतून दिलं आहे. चारू असोपाचं म्हणणं आहे की तिनं हा निर्णय खूप विचारांती घेतला आहे.

हेही वाचा: 'पण मी कार्तिक आर्यनच आहे',युरोपात अभिनेत्यावर आधारकार्ड दाखवण्याची वेळ

व्हिडीओमध्ये चारु म्हणते,''मला माहीत आहे की लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत माझ्यासाठी,पण मी हा कठीण निर्णय पूर्ण विचार करुन घेतला आहे,घाईगडबडीत नाही. चारु म्हणाली,ती कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन घटस्फोट घेत नाही किंवा कुठल्याही क्षुल्लक कारणावरुन देखील ती एवढ्या मोठ्या निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही. मी फक्त हे माझी मुलगी जियानासाठी करत आहे. पुढे चारु म्हणाली,मला विश्वास आहे की तुम्ही मला समजून घ्याल. मी फक्त एवढंच सांगेन की,जर एखाद्या नात्यात तुम्ही खूश नसाल,ते शेवटपर्यंत निभावू शकणार नाही याची जाणीव झाली असेल तेव्हा त्याला एखाद्या चांगल्या वळणावर येऊन संपवणं कधीही योग्य''.

चारुनं हे एकदम बरोबर म्हटलं आहे. कोणत्याही नात्यात मन मारुन जगण्यापेक्षा ही गोष्ट कधीही चांगली की वेळीच त्यातून बाहेर येणं. घटस्फोटाच्या बातम्यांमुळे अभिनेत्री चारुला अनेकांनी ट्रोलही केलं. आणि त्यामुळे चारुनं व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिनं मुलाखतीत हे देखील सांगितलं की,लग्नानंतर राजीवला सुधारण्याच्या खूप संधी दिल्या पण तो बदलला नाही. म्हणूनच आपल्या मुलीच्या जन्मानंतर मी वेगळं होणं योग्य समजलं.

Web Title: Charu Asopa Opens Up About Her Decision To Divorce Rajeev Senpost A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..