'पण मी कार्तिक आर्यनच आहे',युरोपात अभिनेत्यावर आधारकार्ड दाखवण्याची वेळ Kartik Aaryan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral: Kartik Aaryan Offers Aadhar Card As Identity Proof In Europe,why?

'पण मी कार्तिक आर्यनच आहे',युरोपात अभिनेत्यावर आधारकार्ड दाखवण्याची वेळ

'भूलभूलैय्या २' ला प्रेक्षकांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत युरोप ट्रिपवर गेला आहे. मित्रांसोबत तिथे तो दे धमाल करताना दिसत आहे. अर्थात त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं याचा अंदाज लागतो. कारण हॉलिडेदरम्यानही आपल्या इन्स्टाग्रामवर तो भरपूर सक्रिय असल्याचा दिसतोय. आपल्या प्रत्येक गोष्टीची अपडेट तो इन्स्टाग्रामवर देत आहे. आता यादरम्यान कार्तिकचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे,जो खूपच मजेदार आहे. त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याला आपला आधार कार्ड(AadharCard) दाखवायची वेळ आली आहे.(Viral: Kartik Aaryan Offers Aadhar Card As Identity Proof In Europe,why?)

हेही वाचा: कॉफी विथ करण 7: रणवीरचा सेक्स लाईफवर मोठा खुलासा, म्हणाला,'व्हॅनिटीतही...'

कार्तिक आर्यन युरोपात एका रस्त्याच्या कडेला बसलेला दिसतोय आणि तो काहीतरी खात आहे. त्याला वाटलं की परदेशात त्याला कोणी ओळखणार नाही. पण त्याचा चाहतावर्ग इतका मोठा आहे की त्याला लोकांनी पटकनं ओळखलं.

कार्तिक आर्यन काहीतरी खाण्यात बिझी होता,तेव्हा लगेचच एक चाहता त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो कसा,'मी आपल्यासोबत एक फोटो क्लिक करू शकतो का?कारण माझ्या मित्रांना विश्वास बसत नाहीय की तुम्ही कार्तिक आर्यन आहात'. यानंतर कार्तिक लगेच म्हणतो कसा,''पण मी कार्तिक आर्यनच आहे. मी आधारकार्ड दाखवू का?'' हे ऐकल्यावर तिथे उपस्थित लोक हसायला लागतात.

कार्तिक यावेळी रोल,कॅमेरा,अॅक्शन पासून खूप दूर आहे आणि आपलं लाईफ एन्जॉय करतोय. तो आपल्या मित्रांसोबत आनंदाचे क्षण एन्जॉय करतोय. सोशल मीडियावर देखील त्यानं आपल्या हॉलिडेचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा: हिंदुत्वाची कास धरून भारताची निर्मिती अशक्य, लीना मणिमेकलाईचा BJP वर निशाणा

कार्तिक आर्यन 'भूलभूलैय्या २' यशस्वी झाल्यानंतर सध्या तो भलताच चर्चेत आहे. त्या सिनेमातील त्याच्या भूमिकेला खूप नावाजलं देखील गेलं. अनेक दिवसांनी त्याचा सिनेमा हिट ठरल्यानं त्याची स्वारी ही खूशीत आहे. आता यानंतर कार्तिक 'शहजादा','फ्रेडी' अशा सिनेमांतून आपल्याला दिसणार आहे. त्याच्या आगामी सिनेमांच्या प्रदर्शनाची त्याचे चाहतेही वाट पाहतायत.

Web Title: Viral Kartik Aaryan Offers Aadhar Card As Identity Proof In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top