abhishek karishma 
मनोरंजन

या कारणामुळे अभिषेक-करिश्माचं ऐनवेळी मोडलं लग्न

या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र ऐनवेळी..

स्वाती वेमूल

बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक नाती जोडली जातात. त्यापैकी काही नाती लग्नापर्यंत पोहोचतात, मात्र काही नाती त्याआधीच मोडले जातात. असंच एक चर्चेत राहिलेलं नातं होतं अभिषेक बच्चन Abhishek Bachchan आणि करिश्मा कपूर Karisma Kapoor यांचं. या दोघांची लव्हस्टोरी सर्वश्रुत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करिश्मा आणि अभिषेकने लग्नाचा निर्णय घेतला होता. या दोघांच्या लग्नाची तयारीसुद्धा झाली होती. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव हे लग्न होऊ शकलं नव्हतं. अभिषेक आणि करिश्माचं लग्न मोडण्यामागचं कारण जया बच्चन असल्याचंही म्हटलं जातं. (Karisma Kapoor got engaged to Abhishek Bachchan know why they did not marry)

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या तारखेचं औचित्य साधत २००० साली अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा करण्यात आला होता. मात्र साखरपुड्यानंतर या दोघांचं लग्न मोडलं. जया बच्चन यांच्या काही अटींमुळे हे लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. बच्चन कुटुंबाच्या सुनेने चित्रपटसृष्टीत काम करणं जया यांना मान्य नव्हतं आणि करिश्मा अभिनयाचं काम सोडण्यात तयार नव्हती. यामुळे दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले.

जया बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्यातील मतभेदांमुळे दोन्ही कुटुंबामधील संबंधांत कटुता निर्माण झाली आणि हा लग्न मोडण्यात आला. त्यानंतर करिश्माने संजय कपूरशी लग्नगाठ बांधली. तर अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना आराध्या ही मुलगी आहे. तर करिश्माने २०१६ साली संजयला घटस्फोट दिला. करिश्माची दोन्ही मुलं तिच्यासोबतच राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhad Mahotsav : इच्छुक उमेदवारांकडून यावर्षी प्रथमच गाव पातळीपासुन तालुकापातळीपर्यंत आखाड महोत्सवाचे आयोजन

Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Latest Maharashtra News Updates : मराठी तरुणीला मारहाण प्रकरणी मनसे भाजप पदाधिकारी आक्रमक

Shanukripa Heartcare: हृदयविकारावर शस्त्रक्रियेविना उपचार! शनिकृपा हार्टकेअर सेंटरचा २५ वर्षांचा यशस्वी प्रवास

Junnar News : अंबोलीतील दाऱ्याघाटात पर्यटकांची झुंबड; निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी सहलींच्या संख्येत होतेय वाढ

SCROLL FOR NEXT