kangana ranaut yash kgf
kangana ranaut yash kgf  esakal
मनोरंजन

अमिताभ नव्हे 'रॉकी भाई' भारताचा 'अँग्री यंग मॅन' कंगनाचा नवा शोध

युगंधर ताजणे

KGF 2 Movie: टॉलीवूडच्या केजीएफची सध्या सगळीकडे क्रेझ आहे. या (Tollywood Movie) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. 14 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या यशच्या केजीएफ चॅप्टर 2 ने प्रेक्षकांचे (Entertainment News) लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर देखील (Bollywood Actress) केजीएफची चर्चा आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. एस एस राजामौली यांच्या आरआरआरला टक्कर देण्यात केजीएफनं बाजी मारली आहे. चार वर्षानंतर केजीएफचा दुसरा भाग प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे (Kangana Ranaut) गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. प्रेक्षकांचा आवडता रॉकी भाई दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय कमाल करणार असा प्रश्नही नेटकऱ्यांकडून विचारला जात होता.

पॅन इंडिया अंतर्गत केजीएफ 2 ची निर्मीती करण्यात आली आहे. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यशनं त्यात प्रमुख भूमिका साकारली असून त्याच्या त्या भूमिकेचं कौतुक होताना दिसत आहे. आता बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी यशवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामध्ये बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतचं नाव आघाडीवर आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन त्यात बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि केजीएफच्या यशची तुलना केली आहे. कंगना त्या पोस्टमध्ये अमिताभ हे आता बॉलीवूडचे अँग्री यंग मॅन नाहीत. ती जागा आता य़शनं घेतली आहे. कंगनाची ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

केजीएफ 2 मध्ये यश, संजय दत्त, रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कंगनानं यशच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. देशाला आता नवा अँग्री यंग मॅन मिळाला आहे. तिनं यशचं कौतुक करताना मोठी पोस्ट शेयर केली आहे. तसेच यशचं पोस्टरही शेय़र केलं आहे. त्याला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. कंगना आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, यश हा आता नवा अँग्री यंग मॅन आहे. जो गेल्या काही वर्षांपासून गायब झाला होता. तो आता परत आला आहे. अमिताभ यांचा अँग्री यंग मॅन हा सत्तरीच्या काळात होऊन गेला. त्यानंतर ती जागा यशनं घेतली आहे. असं कंगनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT