मनोरंजन

"प्लास्टिकला नकार वसुंधरेला होकार' संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडतर्फे 9 ते 12 ऑक्‍टोबर दरम्यान 10 वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये होत आहे. "प्लास्टिकला नकार वसुंधरेला होकार' या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आहे, अशी माहिती किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे सीनिअर जनरल मॅनेजर रमेश चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी विद्यापीठ, केआयटी, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट, न्यू आर्किटेक्‍चर कॉलेज, दळवीज आर्टस्‌ इन्स्टिट्यूट, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत असतील.  या महोत्सवात पर्यावरण क्षेत्रात काम करणारे मान्यवर, कार्यकर्ते व संस्थांना वसुंधरा सन्मान, वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे,

श्री. चव्हाण म्हणाले, ""देशातील सहा राज्यांत 28 ठिकाणी दहा वर्षे महोत्सव आयोजित केला जात असून, कोल्हापुरातील महोत्सवाचे हे दहावे वर्ष आहे. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडमध्ये वेस्टवर प्रक्रिया केली जाते; तसेच इको फ्रेंडली केमिकल, फ्युअलचा वापर केला जातो. प्लास्टिकमुक्त प्रोडक्‍ट बनविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.'' 

महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये 

  • हेरिटेज वॉकअंतर्गत 11 ऑक्‍टोबरला कात्यायनी, कळंबा व किर्लोस्कर लिमिटेडची सैर घडविणार. 
  • 20 शाळांत रद्दीपासून कापडी पिशव्या तयार करण्यात येत आहेत. 
  • पिशव्या 28 सप्टेंबर ते 8 ऑक्‍टोबर दरम्यान नवदुर्गांच्या परिसरात विक्रीसाठी ठेवणार. 
  • महोत्सवात एकूण 35 चित्रपट दाखविण्यात येणार. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT