Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman khan new song Jee rahe the hum pooja hegde
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Salman khan new song Jee rahe the hum pooja hegde esakal
मनोरंजन

KKBKKJ Song Out : 'ए बाबा जगू दे ना आम्हाला' सलमानचं ‘जी रहे थे हम’ ऐकून नेटकऱ्यांनी काढला जाळ!

सकाळ डिजिटल टीम

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान कधी काय करेल याचा भरवसा नाही. त्याच्या आगामी चित्रपटातील किसी का भाई किसी की जान चित्रपटातील जी रहे थे हम नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते गाणं सलमाननं गायलं आहे.

सलमाननं लाडक्या पूजासाठी ते गाणं गायल्यानंतर सोशल मीडियावर त्याला आलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. अनेकांनी त्याला त्यावरुन ट्रोल केले आहे. यापूर्वी सलमानच्या या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता त्यावेळी त्यातील त्याचा लूक आणि डान्स पाहून त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आपलं वय काय आणि आपण करतो काय असा प्रश्नही त्याला विचारला होता. या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.

Also Read - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

किसी का भाई किसी की जान चित्रपटातील नईयो लगदा नावाचं पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरुन सलमानची नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली होती. आताही त्याच्या नव्या गाण्यात त्यानं स्वताच हातात माईक गाणं गाण्याचा केलेला प्रयत्न किती केविलवाणा आहे हे त्याला नेटकऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे सलमान त्यांच्या टीकेचा धनी होत असल्याचे दिसून आले आहे.

एका नेटकऱ्यानं ते गाणं ऐकल्यानंतर म्हटलं आहे की, त्याचा आवाज किती एकाच साच्यातील आहे. त्याच्यात वेगळेपणा असा नाहीच. मुळातच त्यानं अभिनय सोडून गाण्याच्या फंदात का पडावे हा प्रश्न आहे. पैसे वाचविण्यासाठी त्यानं गाणं गायला सुरुवात केली काय अशा प्रकारे नेटकऱ्यांनी सलमानला कमेंट्स केल्या आहेत.

सलमान खानची निर्मिती असलेला किसी का भाई किसी की जान नावाचा चित्रपट सामजीनं दिग्दर्शित केला आहे. ईदच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. किसी का भाई किसी की जानच्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाल्यास, त्यामध्ये व्यंकटेश दुग्गूबाती, पुजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंद्र सिंह, राघव जुयाल, शहनाज गिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : मुंबईच्या गोलंदाजांनी केला टिच्चून मारा; लखनौचा निम्मा संघ गारद, सामन्यात रंगत

SCROLL FOR NEXT