Laal Singh Chadha Earne News Laal Singh Chadha Earne News
मनोरंजन

Aamir Khan : लाल सिंग चड्ढाने रिलीज होण्यापूर्वीच केली इतक्या कोटींची कमाई

चित्रपटाचे बजेट १८० कोटी असल्याचे सांगितले जात आहे

सकाळ डिजिटल टीम

Laal Singh Chadha Earne News आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत ३७.९६ कोटींची कमाई केली आहे. लाल सिंग चड्ढा निकषावर खरा उतरू शकला नाही. परंतु, या सगळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्म बॉलिवूड चित्रपटांसाठी तारणहार म्हणून उदयास येत आहे. मोठमोठे चित्रपट भरमसाट किमतीत विकत घेऊन हे व्यासपीठ एकमेकांशी स्पर्धा करीत आहेत. असेच काहीसे आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढाबाबतही बोलले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, आमिर खानचा (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा OTT प्लॅटफॉर्म (OTT Platform) Netflix ने विकत घेतला आहे. तथापि, प्लॅटफॉर्मने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. असे सांगितले जात आहे की, रिलीज होण्यापूर्वीच या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट १६० कोटींना विकला गेला होता. जर हा अहवाल बरोबर असेल तर आमिर खानला त्याचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठी रक्कम मिळाली आहे.

लाल सिंह चड्ढाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचे बजेट १८० कोटी असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे हा अहवाल योग्य असेल तर चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलासा देणारी बातमी आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China Earthquake : तिबेट नंतर आता चीन, पाकिस्तान अन् अफगाणिस्तानही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; बचावकार्य तातडीने सुरू, बर्फवृष्टीचे संकट

Pune News: पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान; विधान परिषद निवडणूक; पुणे जिल्ह्यातील २३२ मतदान केंद्रांवर पथके रवाना

Cat Parvovirus : तुमच्या लाडक्या मांजरामध्ये 'ही' 5 लक्षणे दिसताच सावध व्हा! सांगलीत भयानक 'फॅलिन पॅनलिकोपेनिया' विषाणूचा उद्रेक, 'पार्वाव्हायरस' नक्की काय आहे?

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंना पाचशे कोटी रुपये दिल्याच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापले, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट

Pune Crime: बारामतीत गावठी पिस्टल, तीन काडतुसे व कार जप्त; एकाला अटक

SCROLL FOR NEXT