Raju Srivastav Health Update : राजूच्या भावाने सांगितले शुद्धीवर न येण्याचे कारण; म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastav Health Update

Raju Srivastav : राजूच्या भावाने सांगितले शुद्धीवर न येण्याचे कारण; म्हणाला...

Raju Srivastav Health Update हृदयविकाराचा झटका आल्याने राजू श्रीवास्तवला (Raju Srivastav) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहे. राजूची प्रकृती चिंताजनक आहे. निकटवर्तीय आणि हितचिंतक राजू लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करीत आहेत. प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीची अपडेट जाणून घ्यायची आहे. आता राजू श्रीवास्तवचा एमआरआय रिपोर्ट आला आहे. त्याच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्या आहेत. त्यामुळे योग्य ऑक्सिजन पोहोचत नाही. त्याला बरं होण्यासाठी किमान १० दिवस लागतील, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे.

बुधवारी व्यायाम करताना जीममध्ये राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आला होता. ट्रेनरने त्याला एम्स रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने तो लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे. मध्येच राजू श्रीवास्तवने बोट हलवल्याची बातमी आली. मात्र, राजूच्या प्रकृतीत विशेष सुधारणा नसल्याचे रुग्णालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Urfi Javed : उर्फीचा स्क्रीनशॉट शेअर करत ब्लॅकमेलिंगचा दावा; इसमाने केली व्हिडिओ...

राजू श्रीवास्तवला (Raju Srivastav) बरं होण्यासाठी वेळ लागू शकतो. ‘एमआरआय अहवालात राजूच्या मेंदूतील (Consciousness) काही मज्जातंतू दबल्या गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नाही आहे’, असे राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपूने सांगितले आहे. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा उडत आहेत.

राजूच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया हँडलवर एक निवेदन जारी केले आहे. त्याच्या कुटुंबीयांनी लोकांना विनंती केली आहे की त्यांनी अफवा पसरवू नये. राजू लवकरात लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. तो लवकरच बरा होईल.

टॅग्स :Comedianhealth