Lalbaugcha Raja 2023 padya poojan sohala ganpati ganeshotsav mumbai photos sakal
मनोरंजन

Lalbaugcha Raja 2023: 'लागबागच्या राजा'च्या पाद्यपूजनाने मुंबईत गणेशोत्सवाचा श्रीगणेशा! पहा खास फोटो..

यंदा 'लालबागचा राजा'चे ९० वे वर्ष...

नीलेश अडसूळ

गणेशोत्सव अवघ्या 100 दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वांनाच आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनचे वेध लागले आहेत. अशातच मुंबईतील अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि अवघ्या जगभरात ज्याची ख्याती आहे अशा 'लालबाग राजा' या बहुमानाच्या गणपतीचे पाद्य पूजन आज पार पडले. यंदा मंडळाने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने हे पाद्यपूजन केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

(Lalbaugcha Raja 2023 padya poojan sohala ganpati ganeshotsav mumbai photos)

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा'..  दरवर्षी राजाच्या दर्शनाला देशभरातून लाखो भक्त येतात..

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

 लालबागच्या राजाची  मूर्ती ही बाहेरून न आणता त्याच ठिकाणी घडवली जाते. आणि तिथेच बाप्पाचे पाद्यपूजन केले जाते.

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

दरवर्ष या पाद्य पूजन सोहळ्याच्या निमित्ताने हजारो मुंबईकर बाप्पाचे चरणस्पर्श करण्यासाठी जातात. अत्यंत मोठा सोहळा केला जातो.

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

पण यंदा मात्र काही कारणास्तव राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत बापपाचे पाद्य पूजन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

आज संकष्ट चतुर्थी निमित्ताने सकाळी 6 वाजता चिंचपोकळी येथील मूर्तीकारांच्या कार्यशाळेत अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

यंदा 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 90 वे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अत्यंत खास असणार आहे.

Lalbaugcha Raja 2023 padya pujan sohala

'लालबागचा राजा' मंडळाने नुकतेच पाद्य पूजनाचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले असून, भाविकांना आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 317 अंकांनी वाढला; ऑटो-फार्मामध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

'आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा अतरंगी टिझर प्रदर्शित; प्रदर्शनाची तारीखही समोर

Sangli Children : चौदा महिन्यांचा श्रवण व अडीच वर्षांचा करण खेळताना पाण्याच्या टाकीत डोकावले अन्..., आई घरकामात व्यस्त घडलं भयानक

चाहत्याच्या वागण्यामुळे राजामौली संतापले!

Heatwave Survey : ‘हिवताप’ सर्वेक्षण सातारा जिल्ह्यात गतिमान; डेंगीचे ५९, मलेरियाचे ३९, तर चिकनगुनियाचे १७ रुग्‍ण आढळले

SCROLL FOR NEXT